TRENDING:

100 रुपयांची पैज लागली अन् टीम इंडियाला मिळाला 'सुपरस्टार' कॅप्टन! कसा राहिला शुभमन गिलचा प्रवास?

Last Updated:

Shubman Gill Birthday : जो कोणी शुभमनला आऊट करेल, त्याला 100 रुपये बक्षीस देण्याची अट त्यांनी ठेवली. यामुळे शुभमनला आऊट करण्यासाठी आजूबाजूच्या गावांतूनही खेळाडू येऊ लागले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shubman Singh Gill Birthday : टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन शुभमन गिल आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल याचा जन्म पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील चक खेरेवाला गावात झाला. त्याचे वडील लखविंदर सिंह यांना क्रिकेटर व्हायचे होते, पण परिस्थितीमुळे त्यांना शेती करावी लागली. त्यामुळे, त्यांनी आपलं स्वप्न शुभमनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निश्चय केला अन् लेकाला क्रिकेट खेळण्यास प्रवृत्त केलं. त्यांनी आपल्या शेतातच क्रिकेटचे मैदान तयार केलं अन् शुभमनची शाळा सुरू झाली.
Shubman Singh Gill Birthday
Shubman Singh Gill Birthday
advertisement

100 रुपयांची पैज

लहानपणी लखविंदर गिल स्वतः शुभमनसोबत क्रिकेट खेळत असत, त्यामुळे शुभमनला देखील क्रिकेटमध्ये रस वाटू लागला. शुभमनचा खेळ अधिक चांगला व्हावा म्हणून त्यांनी एक अनोखी युक्ती वापरली. जो कोणी शुभमनला आऊट करेल, त्याला 100 रुपये बक्षीस देण्याची अट त्यांनी ठेवली. यामुळे शुभमनला आऊट करण्यासाठी आजूबाजूच्या गावांतूनही खेळाडू येऊ लागले. या अटीमुळे शुभमनला तासनतास नेटमध्ये सराव करण्याची सवय लागली अन् त्याचा सराव अधिक चांगला झाला.

advertisement

युवराज सिंगचं मार्गदर्शन

अनेक वर्ष टेनिस बॉलने खेळल्यानंतर शुभमनला खऱ्या क्रिकेटचा अनुभव तेव्हा आला, जेव्हा त्याचे कुटुंब जलालाबादला स्थलांतरित झाले. तेथे एका छोट्या शाळेत त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सुरुवात झाली. पण त्याच्या स्वप्नांना खरी दिशा तेव्हा मिळाली, जेव्हा त्याचे वडील त्याला चंदीगडला घेऊन गेले आणि मोहाली स्टेडियमजवळच्या एका क्रिकेट ॲकॅडमीत त्याचे ॲडमिशन केलं. तिथं टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार युवराज सिंग याचं मार्गदर्शन शुभमन गिलला लाभलं.

advertisement

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन

शुभमनला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करता यावं म्हणून, त्याचे संपूर्ण कुटुंब एका भाड्याच्या घरात मोहालीजवळ राहू लागले. सकाळी 3:30 वाजता उठून 4 वाजता ॲकॅडमीत पोहोचणे ही शुभमनची दिनचर्या होती. दिवसभर सराव केल्यानंतर तो घरी परतायचा. त्यानंतर पुन्हा संध्याकाळचा सराव पाहण्यासाठी वडिलांसोबत ॲकॅडमीत जायचा. शुभमनसाठी हा प्रवास खुप संघर्षाचा राहिला. त्यानंतर त्याचं अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन झालं अन् टीम इंडियाला शुभमनच्या मेहनतीच्या जोरावर नवा सुपरस्टार मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
100 रुपयांची पैज लागली अन् टीम इंडियाला मिळाला 'सुपरस्टार' कॅप्टन! कसा राहिला शुभमन गिलचा प्रवास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल