Health Tips: आनुवंशिकतेमुळे खरंच वाढतो का कॅन्सरचा धोका? कितपत आहे हे सत्य? पाहा डॉक्टर काय सांगतात, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
जर एखाद्या कुटुंबात आधी कोणाला कॅन्सर झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कॅन्सर होण्याचा धोका तुलनेने अधिक असतो. त्यामुळे जेनेटिक म्युटेशन टेस्ट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पुणे : गेल्या काही वर्षांत कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढले असून जगभरात चीन पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडेच 20 ऑगस्टला जावा नेटवर्कचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार भारतातील दर दहाव्या व्यक्तीला कॅन्सर होतो आहे, म्हणजेच देशातील तब्बल 11 टक्के लोकसंख्या या जीवघेण्या आजाराचा सामना करत आहे. हा अहवाल राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम अन्वेषक गट यांनी सादर केला आहे. कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात? तसेच कॅन्सरचे प्रमाण एवढ्या वेगाने का वाढत आहे? याबाबत कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
आनुवंशिकतेमुळे वाढतो धोका
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी सांगितले की, जर एखाद्या कुटुंबात आधी कोणाला कॅन्सर झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कॅन्सर होण्याचा धोका तुलनेने अधिक असतो. त्यामुळे जेनेटिक म्युटेशन टेस्ट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही टेस्ट रक्ताद्वारे केली जाते. यामध्ये कॅन्सर आनुवंशिक आहे की नाही हे स्पष्ट होते. तसेच आपल्या रक्तात कॅन्सरला जन्म देणाऱ्या दोषपूर्ण पेशी आहेत का, हे देखील समजू शकते.
advertisement
कॅन्सर होण्याची कारणे
दूषित अन्नपदार्थ, प्रदूषित वातावरण आणि अस्वस्थ जीवनशैली यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. महिलांमध्ये स्तनपान न करणे किंवा गर्भधारणा न ठेवणे ही देखील महत्त्वाची कारणे मानली जातात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि युटेराइन कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. याशिवाय तंबाखूचे सेवन, मद्यपान, सततचा ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, तसेच असुरक्षित लैंगिक संबंध किंवा एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार असणे हे देखील काही प्रकारच्या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
कॅन्सर रोखण्यासाठी जेनेटिक टेस्ट महत्त्वाची
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील म्हणाले की, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये विशेषत: जेनेटिक टेस्ट महत्त्वाची ठरते. ही तपासणी रक्ताद्वारे केली जाते आणि यातून आपल्या शरीरात असे जीन्स आहेत का जे पुढे जाऊन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात, हे समजू शकते. त्यांनी सांगितले की, कुटुंबात जर एखाद्याला कॅन्सर झाला असेल, तर इतर सदस्यांनी ही टेस्ट नक्की करून घ्यावी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 10:08 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips: आनुवंशिकतेमुळे खरंच वाढतो का कॅन्सरचा धोका? कितपत आहे हे सत्य? पाहा डॉक्टर काय सांगतात, Video