महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती
पहिल्या दिवशी जवळपास शंभरहून अधिक कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला. महिला कुस्तीपटू राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोलापुरात दाखल झाले आहेत. महिला महाराष्ट्र केसरी साठी अपेक्षा पाटील आणि सृष्टी भोसले यांच्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली. आज सायंकाळी होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे.
advertisement
अपेक्षा पाटीलची विजयी सलामी
महाराष्ट्र केसरी 76 किलोच्या गटात सलामीची लढत अहिल्यानगरची सोनाली मंडलिक आणि सांगलीची अपेक्षा पाटील यांच्यात झाली. मध्यंतरास सोनाली 2-0 गुणाने आघाडीवर होती. त्यानंतर मात्र विजेतेपदाची दावेदार असलेल्या अपेक्षाने जोरदार मुसंडी मारत 6-3 गुणाने कुस्ती जिंकली. शनिवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत 53 किलो गटात सोलापूरची शिवानी करचे हिने पुण्याच्या अवंती रानवडे हिला 6-5 असे हरवलं.
सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकं
दरम्यान, अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी दिल्यानंतर आता फायनलमध्ये कोण जाणार? असा सवाल विचारला जातोय. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके दिली जाणार असून महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या महिला कुस्ती केलेला मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 50 किलो, 53 किलो, 55 किलो, 57 किलो, 59 किलो, 62 किलो, 65 किलो, 68 किलो, 72 किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (65 ते 76 किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत.
