Paranda Kusti : इराणचा पैलवानाला पुण्याच्या पैलवानानं दाखवलं आस्मान, चीतपट करत जिंकलं तीन लाखांचं बक्षिस! Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Dharashiv Paranda Wrestling Video : इराणचा हमीद दिलावर या पैलवानाचा महाराष्ट्रातील पुण्याचा पैलवान रविराज चव्हाण याने पराभव केला आहे.
Raviraj Chavan Vs Hamid Iran : धाराशिवच्या परंडा शहरात ठेवण्यात आलेल्या कुस्तीचा आखाडा रंजक ठरला. याच कुस्तीच्या मैदानात महाराष्ट्र डबल केसरीची गदा जिंकल्यानंतर हर्षद सदगीर हा पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरला होता पण यावेळी हर्षवर्धन सदगीरला पुढच्या पैलवानाला चिटपट करता आले नाही. हर्षद सदगीर याची कुस्ती बरोबरीत सुटल्याने अनेकांची निराशा झाली. पण यावेळी अनेक रंजक कुस्त्या पहायला मिळाल्या. हर्षवर्धन सदगीर याने पूर्ण जोर लावला पण त्याला यावेळी दुखापत झाली होती.
साहिल कोहली vs हर्षवर्धन सदगीर
डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि पंजाबचा पैलवान साहिल कोहली यांच्यात कुस्ती रंगली होती. मात्र कुस्ती ही बराच वेळ चालली यात दोन्हीही पैलवान जखमी झाल्याने डाव बरोबरीत सोडण्यात आला चार लाख रुपयांच्या या कुस्तीचे बक्षीस दोघात विभागून देण्यात आलं. तर याच परंडा शहराच्या कुस्ती मैदानावर इराणचा पैलवान हमीद दिलावर याने ही सहभाग घेतला होता.
advertisement
तीन लाख रुपयांचं बक्षीस काबीज
इराणचा पैलवान हमीद दिलावर याला महाराष्ट्रातील पुण्याचा पैलवान रविराज चव्हाण यानं आस्मान दाखवत पराभव करत तीन लाख रुपयांचं बक्षीस काबीज केलं. रविराजने इराणच्या पैलवानाला चितपट केलं अन् तीन लाखांचं बक्षीस जिंकलं. या कुस्ती स्पर्धेत कुस्तीचे आकर्षण असणाऱ्या देवा थापा यानेही सहभाग घेतला होता. नेहमीप्रमाणे देवा कापाची कुस्तीही अतिशय रंजक झाली होती देवा थापाने गुड्डू हरिद्वार या पैलवानाला चितपट करत बक्षीस जिंकलं.
advertisement
तानाजी सावंतांचा बर्थडे
दरम्यान, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 12:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Paranda Kusti : इराणचा पैलवानाला पुण्याच्या पैलवानानं दाखवलं आस्मान, चीतपट करत जिंकलं तीन लाखांचं बक्षिस! Video








