TRENDING:

BCCI ने आगावू 2 कोटी दिले पण ठरला टीम इंडियाचा सर्वात मोठा व्हिलन! गंभीरच्या नादी लागून 'गेम' बिघडला

Last Updated:

IND vs SA, Washington Sundar : बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरला 2 कोटी अधिकचे देऊन त्या वार्षिक करारात ग्रेड B मध्ये रोहित शर्माच्या वर स्थान दिलंय. त्यामुळे त्याच्याकडून मॅचविनिंगची अपेक्षा ठेवणे गैर नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
South Africa vs India : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये साऊथ अफ्रिकाविरुद्ध टीम इंडियाला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच पराभव टीम इंडियाला पाहावा लागला आहे. अशातच आता टीम इंडियाचे सेमीफायनलचे देखील वांदे झालेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव अँड कंपनीसाठी आगामी दोन मॅचेस महत्त्वाचे असणार आहेत. काहीही करून टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकावे लॉगतीलच. अशातच आता टीम इंडियाचा सर्वात मोठा व्हिलन समोर आला आहे.
IND vs SA, Washington Sundar
IND vs SA, Washington Sundar
advertisement

हातात मॅच होती पण पावरप्लेमध्ये...

टीम इंडियाच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवची नाराजी नाहीये. पण बॅटिंगवर सूर्या निराश आहे. टीम इंडियाच्या हातात मॅच होती पण पावरप्लेमध्ये असा कोणता निर्णय घेतला गेला? ज्यामुळे टीम इंडियाच्या हातातून मॅच निसटली. तर तो प्लॅन होता गौतम गंभीरचा... गंभीरच्या डोक्यातून सुनील नारायणची रणनिती जातच नाहीये, असं दिसतंय. एखादा ऑलराऊंडरच मॅच जिंकवू शकतो, असं गंभीरला वाटतंय. याचा फटका टीम इंडियाला बसला.

advertisement

वॉशिंग्टन सुंदरने माती खाल्ली

बॅटिंगमध्ये पावरप्लेनंतर टीम इंडियाला ज्यावेळी काऊंटर अटॅक करण्याची गरज होती. त्यावेळी गंभीरने सेफ गेम खेळला अन् वॉशिंग्टन सुंदर, ज्याला गंभीर प्रॉपर बॅटर समजतो, त्याला वरती पाठवलं. पण वॉशिंग्टन सुंदरने माती खाल्ली. वॉशिंग्टनने 11 बॉलमध्ये 11 धावा करत घरचा रस्ता पकडला. त्याऐवजी टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल असता तर त्याने इंनिगं सांभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली असती किंवा रिंकु संग याला आक्रमण करण्यासाठी वरच्या क्रमांकावर पाठवणं गरजेचं होतं.

advertisement

रोहित शर्माच्या वर स्थान दिलं पण...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
सर्व पहा

दरम्यान, बीसीसीआय वॉशिंग्टन सुंदरकडे आगामी स्टार म्हणून बघत आहे. गंभीरच्या नरजेत देखील तो प्रॉपर बॅटर आहे पण वॉशिंग्टन अशा परिस्थितीत मॅचविनरची भूमिका बजावू शकत नाही. बीसीसीआयने त्याला 2 कोटी अधिकचे देऊन त्या वार्षिक करारात ग्रेड B मध्ये रोहित शर्माच्या वर स्थान दिलंय. त्यामुळे त्याच्याकडून मॅचविनिंगची अपेक्षा ठेवणे गैर नाही. अशातच आता वॉशिंग्टनने सर्वांना निराश करत टीम इंडियाच्या अपेक्षा भंग केल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI ने आगावू 2 कोटी दिले पण ठरला टीम इंडियाचा सर्वात मोठा व्हिलन! गंभीरच्या नादी लागून 'गेम' बिघडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल