TRENDING:

SRH vs LSG : 5 रन्सची पेनल्टी अन् शेवटच्या बॉलवर जिंकली असली हैदराबाद! ईशानच्या लक्षातच आला नाही ICC चा नियम

Last Updated:

SRH vs LSG Avesh Khan Mistake : ऋषभ पंतने विनिंग शॉट मारला पण आवेश खानने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापूर्वीच बॅटने मारला, जे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
SRH vs LSG Avesh Khan hit ball Penalty : रविवारी आयपीएलच्या डबर हेडर मॅच पार पडल्या. पहिल्या सामन्यात लखनऊच्या नवाबांनी हैदराबादच्या निझामांचा पराभव केला आहे. कॅप्टन ऋषभ पंतची अफलातून मॅच विनिंग खेळीमुळे हैदराबादचा पराभव निश्चित झाला. तर गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियामधून बाहेर असलेल्या मोहम्मद शमीच्या आग ओकणाऱ्या बॉलिंगसमोर हैदराबाद नतमस्तक झाली. तरी देखील हैदराबादने अखेरपर्यंत झुंज दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊने विजय मिळला. अशातच आता हैदराबादची घोडचूक समोर आली आहे. शेवटच्या बॉलवर हैदराबादला विजय मिळवता आला असता. पण आयसीसीचा एक नियम कुणाच्याच लक्षात आला नाही.
SRH vs LSG Avesh Khan hit ball Returns
SRH vs LSG Avesh Khan hit ball Returns
advertisement

आवेश खानकडून घोडचूक

झालं असं की, मॅचचे शेवटचे दोन बॉल बाकी असताना, ऋषभ पंतने विनिंग शॉट मारला पण आवेश खानने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापूर्वीच बॅटने मारला, जे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. आयसीसी नियम पुस्तकानुसार, ही कृती 'अनफेअर प्ले' (Unfair Play) अंतर्गत येते. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा भाग नसलेली कोणतीही व्यक्ती (जसं की बदली खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा बाहेर बसलेले सहकारी) बॉलला स्पर्श करू शकत नाही किंवा त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. अशा परिस्थितीत मैदानी अंपायर्सना विशेष अधिकार असतात.

advertisement

advertisement

5 धावांची पेनल्टी लागली असती

हैदराबाद संघाने अपील केली असती तर नियम क्रमांक 20.1 (Dead Ball) आणि नियम क्रमांक 41 (Unfair Play) लागू होऊ शकलं असतं. ज्यामुळे लखनऊला आणखी 5 धावांची पेनल्टी लागू शकली असती. त्यामुळे दोन बॉलमध्ये 6 धावा असं समीकरण झालं असतं. त्यामुळे शेवटच्या बॉलवर हैदराबादला विजय मिळवता आला असता. मैदानावर उपस्थित असलेल्या खेळाडूंनी आणि व्यवस्थापनाने या बारीक नियमाकडे लक्ष दिले नाही, ज्यामुळे ही संधी हुकली.

advertisement

CSK चा सलग तिसरा पराभव, ऋतुराज रडकुंडीला आला! RCB च्या एका खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, काय म्हणाला?

मोहम्मद शमी मॅचचा हिरो

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, ऋषभ पंतने लखनऊविरुद्ध 68 धावांची खेळी केली. 50 बॉलमध्ये त्याने 9 फोर मारत मॅच जिंकवून दिली. तर एडन मार्करन याने देखील 45 धावांची खेळी केली. मोहम्मद शमी या मॅचचा हिरो ठरला. मोहम्मद शमीने 4 ओव्हरमध्ये 9 रन्स देत अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडची विकेट काढली. फक्त 2.20 च्या इकोनॉमीने शमीने बॉलिंग केली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs LSG : 5 रन्सची पेनल्टी अन् शेवटच्या बॉलवर जिंकली असली हैदराबाद! ईशानच्या लक्षातच आला नाही ICC चा नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल