निर्णय माझ्या 'गट फीलिंग'वर घेतला - सूर्यकुमार यादव
जितेश शर्माला डच्चू देऊन इशान किशनला टीममध्ये घेणं हा निर्णय त्याच्या 'गट फीलिंग'वर आधारित होता. "जितेशला वगळताना मला नक्कीच वाईट वाटलं, कारण तो गेल्या एक ते दीड वर्षांपासून टीमसोबत होता आणि चांगली कामगिरीही करत होता. जर तो खेळला नसता, तर गोष्ट वेगळी असती. पण टॉप ऑर्डरमध्ये आम्हाला 'एक्स-फॅक्टर' आणि फायर पॉवर हवी होती. डाव्या-उजव्या हाताच्या फलंदाजांचं समीकरण हवं होतं, त्यामुळे कोणाला तरी बाहेर बसवणं गरजेचं होतं.
advertisement
घरगुती क्रिकेटमध्ये अतोनात परिश्रम
जेव्हा तो दीड वर्ष टीममधून बाहेर होता, तेव्हा त्याने घरगुती क्रिकेटमध्ये अतोनात परिश्रम घेतले. इशानने भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन सराव सामने खेळले आणि स्वतःच्या खेळावर काम केलं होतं. इशानकडे कोणतंही मानसिक ओझे नव्हतं आणि इशानने न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजपासूनच आपली क्षमता सिद्ध करण्यास सुरुवात केली होती, असं सूर्यकुमारने पीटीआयशी बोलताना यावेळी सांगितलं.
छोटू वर्ल्ड कप जितायेंगा?
ईशान किशनला मी फोन केला अन् विचारलं छोटू वर्ल्ड कप जितायेंगा? त्यावेळी तो मला एकच वाक्य म्हणाला. बस आप भरोसा कर के देखींये... त्यावर मी त्याला रिप्लाय केला, चल किया भरोसा... आणि तो संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये खेळला ते कमाल होतं, असंही सूर्यकुमार यादव यावेळी म्हणाला.
जितेशच्या वडिलांचं निधन
दरम्यान, वर्ल्ड कप सुरू असताना जितेशचे वडील मोहन शर्मा यांचे 1 फेब्रुवारी रोजी एका छोट्या आजारानंतर निधन झाले. त्याने सांगितले की, त्यावेळी तो सात दिवस आपल्या वडिलांसोबत होता आणि त्याच दरम्यान त्याला जाणवले की, त्याच्यासाठी कुटुंब हे जगापेक्षाही अधिक महत्त्वाचे होते. विश्वचषकापेक्षा माझ्या वडिलांना माझी जास्त गरज होती, असं जितेश शर्मा म्हणाला.
