पहिल्या दोन ओव्हरमध्येच 3 विकेट गेल्यानंतर पाकिस्तान यातून सावरू शकली नाही. भारताकडून हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.
भारतीय बॉलर्सनी उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो इशान किशन. पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्माची विकेट शून्य रनवर गमावली, त्यानंतरही एवढ्या तणावाच्या सामन्यात इशान किशन डगमगला नाही आणि त्याने पाकिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.
advertisement
इशान किशनने 40 बॉलमध्ये 192.50 च्या स्ट्राईक रेटने 77 रनची खेळी केली, ज्यात 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू संघर्ष करत असताना इशान किशनने एकट्याने किल्ला लढवला. श्रीलंकेमधल्या वातावरणामुळे इशान किशनचं पूर्ण शरीर घामाने भरलं होतं, एवढंच नाही तर त्याच्या शरिरातली उर्जाही कमी झाली होती.
ड्रिंक्स ब्रेकमध्ये इशान किशन हा त्रासाने विव्हळत होता, एवढच नाही तर तो मैदानामध्येच काही क्षण आडवा झाला, त्यानंतर एनर्जी ड्रिंक घेऊन इशान पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तयार झाला. इशान किशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तसंच टीमसाठी कठीण परिस्थितीमध्येही उभा राहिल्यामुळे क्रिकेट चाहते इशान किशनचं कौतुक करत आहेत.
