TRENDING:

T20 World Cup : 140 कोटी भारतीयांच्या बाजूने पहिला कौल, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यातून आली गूड न्यूज!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी सगळ्यात मोठा सामना सुरू झाला आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय व्होल्टेज सामना पार पडत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी सगळ्यात मोठा सामना सुरू झाला आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय व्होल्टेज सामना पार पडत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
140 कोटी भारतीयांच्या बाजूने पहिला कौल, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यातून आली गूड न्यूज!
140 कोटी भारतीयांच्या बाजूने पहिला कौल, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यातून आली गूड न्यूज!
advertisement

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या टीममध्ये कोणताच बदल केलेला नाही, तर वेस्ट इंडिजने रॉस्टन चेसला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

भारतासाठी हा सामना का महत्त्वाचा?

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला, त्यामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटलाही मोठा धक्का बसला. आता सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करावं, यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाला आणि भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.

advertisement

या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला तर मात्र टीम इंडियासमोर सेमी फायनलला पोहोचणं कठीण होऊन जाईल. वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेने पराभूत केलं तसंच भारताने दोन्ही सामने जिंकले तर भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचे समसमान म्हणजेच 4-4 पॉईंट होतील आणि मग चांगला नेट रनरेट असलेल्या टॉप 2 टीम सेमी फायनलला पोहोचतील.

advertisement

एका सामन्यात एका विजयासह वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +5.350, तर दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा +3.800 एवढा आहे. भारताचा नेट रनरेट हा मायनस 3.800 आहे, हा रन रेट प्लसमध्ये आणून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला पिछाडीवर टाकण्यासाठी भारताला दोन्ही सामने अत्यंत मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका रेकॉर्ड

advertisement

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 5 मॅच झाल्या आहेत, यातल्या 4 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला आहे तर एक मॅच वेस्ट इंडिजने जिंकली आहे, त्यामुळे या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचाच विजय व्हावा, अशी 140 कोटी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. वेस्ट इंडिजने टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जो एकमेव सामना जिंकला आहे, तो 2016 साली भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधला आहे. नागपूरला झालेल्या त्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेटने पराभव केला आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 29 टी-20 मॅच झाल्या आहेत, यातल्या 15 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा तर 14 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला आहे.

advertisement

वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन

ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्डे, गुडाकेश मोटी, शमार जोसेफ

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट
सर्व पहा

एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक , रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 140 कोटी भारतीयांच्या बाजूने पहिला कौल, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यातून आली गूड न्यूज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल