बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट टीमनेही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बांगलादेशच्या मागणीला पाठिंबा देत आहे. टी-20 वर्ल्ड कपमधून बांगलादेश बाहेर पडल्यानंतर, पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी पंतप्रधानांच्या येण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले. जर सरकार म्हणत असेल की पाकिस्तान सहभागी होणार नाही, तर पाकिस्तानही देखील बाहेर पडेल, असं नक्वी म्हणाले. त्यामुळे जर पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर पडली तर कोणती टीम त्यांची जागा घेईल?
advertisement
202e6 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 टीम सहभागी होत आहेत. आयसीसीच्या पूर्ण सदस्य टीमव्यतिरिक्त, रिजनल क्वालिफायरमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या टीम देखील वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत आहेत. पाकिस्तानच्या दर्जाचा कोणताही संघ सध्या पाकिस्तानची जागा घेण्यास सक्षम नसला तरी, जर पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर आयसीसीकडे अनेक पर्याय आहेत ज्यांचा विचार केला जाऊ शकतो. हे पर्याय रिजनल क्वालिफायर राऊंडमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या टीम आहेत. यामध्ये पापुआ न्यू गिनी, केनिया, टांझानिया, बर्म्युडा आणि जर्सी यांचा समावेश आहे. या सर्व टीम रिजनल क्वालिफायर राऊंडमध्ये स्पर्धेतून शेवटच्या टप्प्यात बाहेर झाल्या.
पापुआ न्यू गिनी पूर्व आशिया पॅसिफिक क्वालिफायर राऊंडचा भाग होती. युएई आणि ओमान तिथून क्वालिफाय झाले असल्याने, रँकिंग आणि कामगिरीच्या आधारे पापुआ न्यू गिनी आशियातून पाकिस्तानची जागा घेण्यासाठी एक प्रमुख दावेदार असू शकते. झिम्बाब्वे आणि नामिबिया देखील आफ्रिका क्वालिफायर राऊंडमधून पात्र ठरले. केनिया आणि टांझानिया सेमी फायनलमध्ये पोहोचल्या पण, अखेर त्यांना बाहेर पडावे लागले; या दोन टीमना बॅकअप म्हणून देखील विचारात घेतले जाऊ शकते. बर्म्युडा आणि जर्सीचा देखील विचार केला जाऊ शकतो.
पाकिस्तान खोडा घालणार?
टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 टीम सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी पाच टीमच्या चार ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. पाकिस्तान क्रिकेट टीम ग्रुप ए मध्ये आहे. पाकिस्तानसोबत भारत, अमेरिका, ओमान आणि नेदरलँड्स आहेत. पाकिस्तानचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे नेदरलँड्सविरुद्ध आहे. त्याच ग्रुपमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्ध सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
