पुढील दोन सामने भारतासाठी करो या मरो असेच आहेत. पण, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने टीम इंडियाला वॉर्निंग दिली आहे. आम्ही भारतामध्ये फार टी-20 सामने खेळलेलो नाही, पण आम्ही हे कारण देणार नाही. टीम इंडियाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असं सिकंदर रझा म्हणाला आहे.
झिम्बाब्वेने गेल्या दशकाहून अधिक काळ भारतात एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तरीही, त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. झिम्बाब्वेने ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमना पराभूत करून मोठा अपसेट करून दाखवला. आता सुपर 8 मध्ये त्यांचे आव्हान आणखी कठीण असेल. या टप्प्यात, त्यांना भारत, दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे.
advertisement
निकाल काहीही असो आम्ही सकारात्मक मानसिकतेने मैदानावर येऊ, असं झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला आहे. रझाने मान्य केले की भारतात खेळण्याचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो, पण मुख्य गोष्ट म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे. त्याने सांगितले की मैदान लहान असो वा मोठे, दोन्ही टीमसाठी परिस्थिती सारखीच असेल. झिम्बाब्वेचे ध्येय केवळ चांगली कामगिरी करणे आहे.
सेमी फायनलच्या शक्यतांबद्दल, रझा म्हणाला की झिम्बाब्वेला सेमी फायनलसाठी दावेदार मानलं पाहिजे. संघाला अजूनही स्वतःला सिद्ध करायचे आहे, पण हे आव्हान आम्हाला प्रेरणा देत आहे, असं रझा म्हणाला. संघ प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक विजयाने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे आणि हा आत्मविश्वास आम्हाला सुपर 8 मध्ये जोरदार खेळण्याची शक्ती देत आहे. आम्ही फक्त सुपर-8 मध्ये सहभागी होण्यासाठी आलो नाही, तर पूर्ण ताकदीने स्पर्दा करण्यासाठी आलो आहे. असा विश्वास रझाने व्यक्त केला.
