TRENDING:

SA vs IND : टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते का? सूर्यासाठी दोन गोष्टी ठरणार गेमचेंजर, 'ग्रुप ऑफ डेथ'मध्ये ट्विस्ट!

Last Updated:

Team india Semifinal Scenario : टीम इंडियाचे आगामी सामने वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे विरुद्ध आहेत. दोन्ही टीम्स तगड्या असल्याने ग्रुप ऑफ डेथमध्ये अनेक ट्विस्ट पहायला मिळू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साऊथ अफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं गणित आता अत्यंत गुंतागुंतीचं झालं आहे. जर पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल, तर टीम इंडियाला आगामी दोन सामन्यात मोठी कसरत करावी लागणार आहे.
Team india Semifinal Scenario After Beat from South Africa
Team india Semifinal Scenario After Beat from South Africa
advertisement

टीम इंडियाचे आगामी सामने वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे विरुद्ध आहेत. दोन्ही टीम्स तगड्या असल्याने ग्रुप ऑफ डेथमध्ये अनेक ट्विस्ट पहायला मिळू शकतात. त्यामुळे आपल्या आगामी दोन्ही मॅचमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावाच लागणार आहे.

advertisement

अशातच टीम इंडियाला वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे यांच्याविरुद्ध फक्त विजय मिळवायचा नाहीये तर त्यांना मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. टीम इंडियाचा नेट रनरेट -3.800 आहे. टीम इंडियाला काहीही करून हा नेट रनरेट वाढवावा लागेल.

advertisement

टीम इंडियाचा आगामी सामना झिम्बॉब्वेविरुद्ध येत्या 26 तारखेला असेल तर वेस्ट इंडिजविरुद्ध 1 तारखेला मॅच खेळवली जाईल. या दोन्ही मॅचमध्ये विजय टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो.

advertisement

तसेच टीम इंडियासाठी साऊथ अफ्रिकेने देखील आगामी दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणं आवश्यक असणार आहे. साऊथ अफ्रिकेने जर दोन्ही सामने जिंकले तर टीम इंडियासाठी सेमीफायनलची रेस सोपी होणार आहे.

advertisement

टीम इंडियाच्या पराभवानंतर साऊथ अफ्रिका आता पाईंट टेबलच्या टॉपवर असून टीम इंडियाने दोन पाईंट्स गमावले आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादवला नव्या रणनितीने मैदानात उतरावं लागणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
सर्व पहा

दरम्यान, टीम इंडियाला आगामी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करावे लागणार आहे. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर बसवण्यासाठी गेमप्लॅन तयार करावा लागणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SA vs IND : टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते का? सूर्यासाठी दोन गोष्टी ठरणार गेमचेंजर, 'ग्रुप ऑफ डेथ'मध्ये ट्विस्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल