सिडनी थंडरसोबत धोका?
पावसामुळे सामना व्यत्यय आला आणि सामना प्रत्येकी 5 ओव्हरचा खेळवावा लागला. अॅडलेड ओव्हलवर पहिले बॅटिंग करताना स्ट्रायकर्सने त्यांच्या पाच ओव्हरमध्ये 2 आऊट 45 रन केल्या. ओपनर लॉरा वोल्वार्डने स्ट्रायकर्सच्या डावाची आक्रमक सुरुवात केली, तिने 13 बॉलमध्ये 22 रन केल्या, ज्यामध्ये दोन फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. कर्णधार टहलिया मॅकग्रा 6 बॉलमध्ये 12 रन करून नाबाद राहिली, पण संघाचा स्कोअर फारसा पोहोचू शकला नाही. थंडरच्या बॉलरनी चांगली सुरुवात केली, शबनीम इस्माइलने एका ओव्हरमध्ये 6 रन देऊन एक बळी घेतला, तर लुसी फिनने 12 रनवर एक विकेट मिळवली.
advertisement
लक्ष्याचा पाठलाग करताना, थंडरची सुरुवात चांगली झाली. मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन जोडल्या. सलामीवीर फोबी लिचफिल्डने आक्रमक बॅटिंग केली आणि 15 बॉलमध्ये पाच फोरसह नाबाद 38 रन केल्या. डार्सी ब्राउनने टाकलेल्या ओव्हरमध्ये तिने सलग चार फोर मारले. दुसऱ्या ओव्हरनंतर थंडरचा स्कोअर 35/0 झाला, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता, पण तिसऱ्या ओव्हरच्या शेवटी पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला.
लाईव्ह सामन्यात मोठा गोंधळ
थंडरने 2.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 43 रन केल्या, पण मुसळधार पावसाने खेळ थांबवला. थंडरला जिंकण्यासाठी शेवटच्या 3 रनची आवश्यकता होती, पण बॉल निसरडा असल्याचे कारण देत अंपायरनी सामना रद्द केला. यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. थंडरची युवा स्टार फोबी लिचफिल्डने सामना रद्द झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली आणि म्हणाली, "खूप निराशा झाली. हे लाजिरवाणे आहे." दरम्यान, स्ट्रायकर्सची कर्णधार ताहलिया मॅकग्रा म्हणाली, "कठीण निर्णय. पाऊस थांबला होता, पण बॉल निसरडा झाला होता. अंपायरनी योग्य निर्णय घेतला."
