सुरूवातीपासूनच टीम इंडियाच्या बॉलरनी न्यूझीलंडला एकामागोमाग एक धक्के द्यायला सुरूवात केली. 22 रनवरच न्यूझीलंडच्या 5 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर जेकब कॉटर, जसकरन संधू, स्लेविन संजय आणि कॅलम सॅमसन याने न्यूझीलंडची बॅटिंग सावरली. सॅमसनने 48 बॉलमध्ये नाबाद 37 रन केले, तर संजयने 28, कॉटरने 23 रनची खेळी केली.
भारताकडून आरएस अंबरिशने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर हेनिल पटेलला 3 विकेट घेण्यात यश आलं. खिलन पटेल, मोहम्मद इनान आणि कनिष्क चौहान यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. आरएस अंबरिश हा तामिळनाडूचा ऑलराऊंडर आहे. याच वर्षी 18 वर्ष आणि 2 दिवसांचा असताना अंबरिशने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 43 रन केल्या आणि 2 विकेटही घेतल्या आहेत. 3 यूथ टेस्टमध्ये अंबरिशने 29 च्या सरासरीने बॅटिंग करून 6 विकेटही घेतल्या आहेत. तर दुसरीकडे हेनिल पटेल गुजरातच्या बडोद्यामध्ये स्थानिक क्रिकेट खेळतो.
advertisement
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया बी ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमधून भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशची टीम आधीच सुपर-6 राऊंडमध्ये क्वालिफाय झाली आहे. ग्रुप बी मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवले आहेत. भारताने आधी अमेरिकेचा 6 विकेटने आणि त्यानंतर बांगलादेशचा 18 रननी पराभव केला. 2 मॅचमध्ये 4 पॉईंट्ससह टीम इंडिया ग्रुप बी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या सामन्यानंतर आता टीम इंडिया सुपर सिक्सच्या ग्रुप-2 मध्ये खेळणार आहे, जिथे त्यांचा सामना बांगलादेश, झिम्बाब्वे, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध होईल.
