या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण सतत पाऊस पडत असल्यामुळे मॅचमध्ये व्यत्यय येत होता. 22 रनवरच न्यूझीलंडने त्यांच्या 5 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर जेकब कॉटर, जसकरन संधू, कॅलम सॅमसन आणि सेलविन संजय यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला.
कॅलम सॅमसनने सर्वाधिक 37 रनची खेळी केली, तर सेलविन संजयने 28, जेकब कॉटरने 23 आणि जसकरन संधूने 18 रन केले. भारताकडून आरएस अंबरिशने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर हेनिल पटेलला 3 विकेट घेण्यात यश आलं. खिलन पटेल, मोहम्मद इनान आणि कनिष्क चौहान यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं आहे.
advertisement
टीम इंडिया सुपर सिक्समध्ये
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया बी ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमधून भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशची टीम आधीच सुपर-6 राऊंडमध्ये क्वालिफाय झाली आहे. ग्रुप बी मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवले आहेत. भारताने आधी अमेरिकेचा 6 विकेटने आणि त्यानंतर बांगलादेशचा 18 रननी पराभव केला. 2 मॅचमध्ये 4 पॉईंट्ससह टीम इंडिया ग्रुप बी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या सामन्यानंतर आता टीम इंडिया सुपर सिक्सच्या ग्रुप-2 मध्ये खेळणार आहे, जिथे त्यांचा सामना बांगलादेश, झिम्बाब्वे, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध होईल.
