खरं तर ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरूद्ध् दुसऱ्या वनडे सामन्यात वैभव सुर्यवंशीने धडाकेबाज खेळी आहे. वैभवने या सामन्यात 68 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 5 चौकार लगावले आहेत.
advertisement
वैभवने या खेळीनंतर आणखी एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आतापर्यंत युवा वनडे सामन्यात सर्वांधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम 38 होता.पण आता वैभवने10 युवा वनडे सामन्यात 39 षटकार मारून हा रेकॉर्ड मोडला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू उन्मुक्त चंदच्या नावावर युवा वनडे सामन्यात 38 षटकार ठोकण्याचा विक्रम नावावर होता. उन्मुक्त चंदने 21 सामन्यांमध्ये 38 षटकार मारले होते. तर वैभव सूर्यवंशीला हा पराक्रम करण्यासाठी फक्त 10 डाव लागले.
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने 26 ऑगस्ट 2012 रोजी आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक जिंकला. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता. याच विश्वविजेत्या खेळाडूचा रेकॉर्ड मोडून वैभवने मोठा पराक्रम केला आहे.
[caption id="attachment_1427195" align="alignnone" width="1200"]
भारतीयांमध्ये, वैभव सूर्यवंशी आणि उन्मुक्त चंद यांच्यानंतर, युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. भारतीय संघात आता एक स्थापित नाव असलेल्या जयस्वालने 2018 ते 2020 दरम्यान खेळल्या गेलेल्या 27 सामन्यांमध्ये 30 षटकार मारले.