Navratri 2025 : गरबा खेळताना चक्कर किंवा अशक्तपणा जाणवतोय? वेळीच करा हे उपाय, डॉक्टरांनी दिला सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गरबा आणि दांडियाचे धूमधडाक्यात आयोजन केले जाते. मात्र दांडिया आणि गरबा खेळताना चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवण्याच्या तक्रारी तरुणाईत पाहायला मिळतात.
पुणे: सध्या महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात तरुणाईला वेध लागतात ते गरबा आणि दांडिया खेळण्याचे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गरबा आणि दांडियाचे धूमधडाक्यात आयोजन केले जाते. मात्र दांडिया आणि गरबा खेळताना चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवण्याच्या तक्रारी तरुणाईत पाहायला मिळतात. मात्र हे टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे याबाबतची अधिक माहिती डॉ. सचिन पवार यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र अनेकवेळा गरबा आणि दांडिया खेळताना काही लोकांना चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवणे अशा तक्रारी जाणवतात.
advertisement
हायड्रेशनची काळजी महत्त्वाची
गरबा खेळण्याआधी पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कारण गरबा आणि दांडिया खेळताना शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो, ज्यामुळे डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. गरबा खेळताना अधूनमधून थोडे पाणी प्यायले तर चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे ह्या समस्या येणार नाहीत, त्यामुळे पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
advertisement
अशी वाढवा एनर्जी लेव्हल
गरबा आणि दांडिया खेळण्याअगोदर सकस आणि पौष्टिक आहार घ्या. न पचणारे आणि तेलकट पदार्थ टाळावेत. फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स आणि फळांचे ज्यूस घ्यावे, ज्यामुळे एनर्जी लेव्हल कायम राहण्यास मदत होते. सोबतच चॉकलेट आणि एनर्जी ड्रिंक सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे.
झोप महत्त्वाची
अनेक वेळा गरबा किंवा दांडिया केल्यानंतर शरीर थकते आणि शरीरावर ताण पडतो. त्यामुळे पुरेशी झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. शरीराला आराम देण्यासाठी झोप न टाळता रात्री आरामदायक झोप घेणे महत्त्वाचे आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 24, 2025 4:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Navratri 2025 : गरबा खेळताना चक्कर किंवा अशक्तपणा जाणवतोय? वेळीच करा हे उपाय, डॉक्टरांनी दिला सल्ला