ghagra choli : आकर्षक घागरा चोळी, फक्त 200 रुपयांपासून, खरेदीसाठी अमरावतीमधील हे बेस्ट ठिकाण, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
सर्वत्र आता नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्री म्हटलं की, दांडिया तर आलाच. यासाठी अनेकजण महिलांसाठी घागरा ओढणी आणि पुरुषांसाठी त्यांचा विशिष्ठ प्रकारचा ड्रेस खरेदी करतात.
अमरावती: सर्वत्र आता नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्री म्हटलं की, दांडिया तर आलाच. यासाठी अनेकजण महिलांसाठी घागरा ओढणी आणि पुरुषांसाठी त्यांचा विशिष्ट प्रकारचा ड्रेस खरेदी करतात. तसेच छोट्या मुलांचे फोटो शूट करण्यासाठी देखील असे ड्रेसेस खरेदी केले जातात. अमरावतीमध्ये जर तुम्हाला ड्रेसेस खरेदी करायचे असतील तर अंबादेवी मंदिराजवळ अंबा स्टोअर्स या दुकानातून तुम्ही खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला व्यवसाय करायचा असल्यास तुम्हाला होलसेल दरात देखील याठिकाणी खरेदी करता येईल. सर्व कपडे ते स्वतः बनवत असल्याने होलसेल दरातच ते विक्री करतात.
आकर्षक घागरा चोळी 200 रुपयांपासून
अंबा स्टोअर्सचे मालक निमिश दमानी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, अमरावतीमधील अंबादेवी मंदिर परिसरात आमचे अंबा स्टोअर्स या नावाने दुकान आहे. आमच्याकडे सर्वच सणासुदीचे ट्रेंडिंग कपडे मिळतात. विशेष म्हणजे सर्व कपडे आम्ही स्वतः बनवतो. त्यानंतर त्याची होलसेल दरात विक्री करतो. सध्या नवरात्री सुरू आहे. त्या अनुषंगाने आता महिलांसाठी घागरा चोळी आहे. अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून त्यात लागेल त्या साईजमध्ये सर्वच कलर उपलब्ध आहेत.
advertisement
लहान मुलांसाठी 200 रुपयांपासून ते 700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. फुल साईज असणारी ब्रँडेड घागरा चोळी 1 हजार रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्यासोबत लागणारी सर्वच प्रकारची ज्वेलरी देखील उपलब्ध आहे. ब्लॅक मेटल, व्हाइट मेटल आणि कवड्यांची ज्वेलरी 100 रुपयांपासून उपलब्ध आहे.
advertisement
पुरुषांसाठीही ड्रेस उपलब्ध
तसेच पुरुषांसाठी लागणारे सर्वच प्रकारचे दांडियासाठी लागणारे ड्रेसेस उपलब्ध आहेत. त्यातही अगदी छोट्या बाळापासून ते फुल साईज पर्यंत सर्वच कलर उपलब्ध आहेत. त्यात 200 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत सुंदर सुंदर कपडे उपलब्ध आहेत. तसेच 15 प्रकारच्या दांडिया स्टिक देखील उपलब्ध आहे. त्यासुद्धा 50 रुपयांपासून आमच्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
ओटीसाठी लागणारे पातळ आणि सोहळे अगदी स्वस्त दरात
नवरात्रीमध्ये महिला देवीची ओटी भरतात. त्यात देवीसाठी साडी, पातळ, खण, सोहळे देवीला अर्पण करतात. ते सर्व साहित्य अगदी 100 रुपयांपासून उपलब्ध आहे. तसेच व्यवसाय करण्यासाठी देखील अगदी होलसेल दरात आम्ही विक्री करतो. आमच्या दुकानाचा पत्ता अंबादेवी परिसरात अंबा स्टोअर्स, अशी माहिती त्यांनी दिली.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 24, 2025 3:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ghagra choli : आकर्षक घागरा चोळी, फक्त 200 रुपयांपासून, खरेदीसाठी अमरावतीमधील हे बेस्ट ठिकाण, Video