Driver Woman: रोज 110 किमी प्रवास, 50 पेक्षा जास्त विद्यार्थी, स्कूल व्हॅन चालवणाऱ्या उज्वला यांची कहाणी, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिला कर्तृत्वाची छाप उमटवत आहे. याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे एच.एस.सी डी.एड पर्यंत शिक्षण शिकलेल्या उज्वला यादव ह्या गेल्या 6 वर्षापासून स्कूल व्हॅन चालवत आहेत.
सोलापूर : चूल आणि मूल यातून बाहेर पडून बदलत्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला झेप घेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना दिसत आहेत. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिला कर्तृत्वाची छाप उमटवत आहे. याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे एच.एस.सी डी.एड पर्यंत शिक्षण शिकलेल्या उज्वला यादव ह्या गेल्या 6 वर्षापासून स्कूल व्हॅन चालवत आहेत.
सोलापूर शहरातील ऋषिकेश नगर हैदराबाद रोड येथे उज्वला निलेश यादव राहण्यास आहेत. एच.एस.सी डी.एड पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षकीपेशा न स्वीकारता उज्वला यांनी काहीतरी हटके वेगळा काम करायचा निर्णय घेतला. एका खासगी प्रशिक्षण केंद्रात जाऊन उज्वला यांनी मोटर ड्रायव्हिंगची ट्रेनिंग घेतली आणि स्कूल व्हॅन चालवण्यास सुरुवात केली. पती आणि सासूने साथ दिल्याने ते गेल्या 6 वर्षापासून सोलापूर शहरात स्कूल व्हॅन चालवत आहेत.
advertisement
उज्वला यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळेतून घरी आणायचं आणि घरी सोडण्याचं काम करत आहेत. यासाठी त्यांना दररोज 110 किलोमीटर प्रवास करत आहेत. तर या व्यवसायातून त्या महिन्याला 40 हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे.
advertisement
सोलापूर शहरातील ऑर्चिड कॉलेज, श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल, श्री सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर, सेंट जोसेफ स्कूल, या शाळेसाठी काम करत होत्या. तर आता इंडियन मॉडेल स्कूल, मॉडेल पब्लिक स्कूल, इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल नागेश करजगी ऑर्किड स्कूलसाठी करत आहेत. स्कूल व्हॅनचं स्टेरिंग हातात घेऊन उज्वला मुलांना उच्च शिक्षण देण्याचं काम ते करत आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी मोलाची साथ दिल्याने हे शक्य झाल्याचा मत महिला स्कूल व्हॅन चालक उज्वला यादव यांनी व्यक्त केलं.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 23, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Driver Woman: रोज 110 किमी प्रवास, 50 पेक्षा जास्त विद्यार्थी, स्कूल व्हॅन चालवणाऱ्या उज्वला यांची कहाणी, Video