टीम इंडियासाठी 104 वनडे आणि 17 कसोटी सामने खेळून भारताचं प्रतिनिधित्व करणारे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या गंभीर आजाराशी लढत आहेत. याबाबतची माहिती त्यांचे भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी शेअर केली. त्याने माझा दादा लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा असं आवाहन करावं असं चाहत्यांना या पोस्टमधून आवाहन केलं आहे.
सचिन तेंडुलकरसोबत एकेकाळी त्याच्या जबरदस्त स्ट्रोक खेळासाठी ओळखले जाणारे माजी फलंदाज विनोद कांबळी गेल्या डिसेंबरमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे हालचाल करणं, बोलण्यात अडचणीत आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती, मात्र आता प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या भावाने सांगितलं की दादा काही चुकीच्या सवयींमध्ये काही काळ अडकला होता. त्याचा परिणाम त्याच्या करियरवर देखील झाला. दादा आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही.
advertisement
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी युरिन इन्फेक्शन होतं. हे इन्फेक्शन ठिक झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. दादाला बोलताना त्रास होतो असंही त्याच्या भावाने सांगितलं. वांद्र्यातील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालण्या फिरण्यात अडचणी येत असल्याचंही वीरु कांबळी याने सांगितलं. त्याने याची माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली. त्याने चाहत्यांना दादा लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा असं म्हटलं आहे.