दीप्ती शर्मावर सौरव गांगुलीने बोली लावल्यानंतर यूपी वॉरियर्सने आरटीएम म्हणजेच राईट टू मॅच कार्डचा वापर केला, त्यानंतर दिल्लीने दीप्ती शर्मासाठी 3 कोटी 20 लाख रुपये द्यायची तयारी दर्शवली, पण यूप वॉरियर्सनेही दीप्तीसाठी तेवढीच रक्कम देऊन आरटीएमचा वापर केला, त्यामुळे दीप्ती शर्मा पुन्हा एकदा यूपी वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये आरटीएमचा वापर झालेली दीप्ती शर्मा ही पहिलीच खेळाडू ठरली आहे.
advertisement
महिला प्रीमियर लीगच्या लिलावाआधी यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला रिलीज केलं होतं. डब्ल्यूपीएलच्या मागच्या लिलावात दीप्ती शर्मासाठी यूपी वॉरियर्सने 2.60 कोटी रुपये मोजले होते, पण वर्ल्ड कप फायनलमधल्या कामगिरीनंतर दीप्तीची किंमत तब्बल 60 लाखांनी वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दीप्ती शर्माने ऑलराऊंड कामगिरी केली होती. दीप्तीने पहिले बॅटिंगमध्ये 58 बॉलमध्ये नाबाद 58 रन केले, यानंतर बॉलिंगमध्ये तिने 9.3 ओव्हरमध्ये 39 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीबद्दल दीप्तीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं.
