TRENDING:

AirPods Pro 3: गाणी ऐकणं झालं जुनं, आता हेडफोन करेल समोरच्याचं बोलणं ट्रान्सलेट, Apple चा मोठा धमाका

Last Updated:

Apple ने त्यांच्या नवीन AirPods Pro 3 मध्ये एक खास फिचर्स जोडले आहे, ज्याचे नाव लाइव्ह ट्रान्सलेशन आहे.  हे एक असं फिचर आहे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जगभरातील मोबाईल प्रेमी आणि वापरकर्त्यांचं लक्ष लागून असलेल्या ॲपल कंपनीच्या इव्हेंटला सुरुवात झाली आहे. ॲपल नवीन Iphone 17 लाँच करणार आहे. पण त्याआधी थर्ड जनरेशनमधील AirPods Pro 3 लाँच केलं आहे.  नवीन TWS हेडसेट आता नॉइज कॅन्सलेशन (ANC) मध्ये पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
News18
News18
advertisement

AirPods Pro 3 ची ANC क्षमता AirPods Pro 2 पेक्षा दुप्पट आणि पूर्वीच्या AirPods Pro मॉडेलपेक्षा चार पट अधिक प्रभावी आहे. याचा अर्थ असा की वापरकर्त्यांना संगीत, कॉलिंग आणि मनोरंजनादरम्यान बाह्य आवाजापासून जवळजवळ पूर्ण आराम मिळेल.

Apple ने AirPods Pro 3 मध्ये नवीनतम ऑडिओ तंत्रज्ञान आणि हायटेक चिपसेट वापरले आहे, ज्यामुळे ध्वनी गुणवत्ता आणखी स्पष्ट आणि इमर्सिव्ह होतं. वायरलेस इअरबड्स सेगमेंटमध्ये, हे डिव्हाइस प्रीमियम वैशिष्ट्यांसह बाजारात मोठा बदल आणण्यासाठी सज्ज आहे. Apple ने त्यात 8 तासांची बॅटरी लाइफ असल्याचा दावा केला आहे.

advertisement

Apple ने त्यांच्या नवीन AirPods Pro 3 मध्ये एक खास फिचर्स जोडले आहे, ज्याचे नाव लाइव्ह ट्रान्सलेशन आहे.  हे एक असं फिचर आहे, जे Apple Intelligence वर काम करतं आणि संभाषणादरम्यान त्वरित भाषांतर करण्यास मदत करतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जर बोलणारे दोन्ही लोक AirPods Pro 3 वापरत असतील तर हे फिचर आणखी चांगलं काम करेल. म्हणजेच, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांसाठी, हे हेडफोन रिअल-टाइम ट्रान्सलेटर म्हणून काम करेल. नवीन एअरपॉड्सची किंमत २४९ डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. ते आता प्री-बुकिंग करता येते पण तुम्हाला ते १९ सप्टेंबर रोजीच मिळेल. भारतात त्याची किंमत लवकरच जाहीर केली जाईल.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
AirPods Pro 3: गाणी ऐकणं झालं जुनं, आता हेडफोन करेल समोरच्याचं बोलणं ट्रान्सलेट, Apple चा मोठा धमाका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल