TRENDING:

Apple करतेय मोठी तयारी! हार्ट रेट आणि तापेची माहिती देईल इअरबड्स

Last Updated:

Apple आधीच त्यांच्या iPhone आणि Apple Watch मध्ये डेडिकेटेड हेल्थ फीचर्स देत आहे. आता कंपनी Next Gen AirPods Pro मध्ये नवीन हेल्थ फीचर्स समाविष्ट करणार आहे. ज्यानंतर यूझर्स फक्त एअरपॉड्सच्या मदतीने शरीराचे तापमान आणि हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवण्यास सक्षम असतील, ज्याचा फायदा अनेकांना होईल. याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Apple आपल्या आगामी AirPods Pro साठी मोठी तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी एक मोठा प्लॅन बनवत आहे. काही नवीन फीचर्सची चाचणी केली जात आहे, ज्याच्या मदतीने नेक्स्ट जेन AirPods Pro मध्ये हार्ट रेट आणि शरीराचे तापमान तपासले जाऊ शकते.
अॅपल एअरपॉड्स प्रो
अॅपल एअरपॉड्स प्रो
advertisement

Apple ने नेक्स्ट जनरेशनच्या AirPods Pro वर काम सुरू केले आहे, ज्यामध्ये Apple Watch सारख्या अनेक हेल्थ फीचर्स सामिल असतील. या वर्षी कंपनीने त्यात Hearing Aid फीचर लाँच केले आहे, जे iOS 18.1 वर काम करते.

Apple Watch मध्ये हेल्थ फोक्स्ड फीचर्स प्रदान केल्यानंतर, कंपनी AirPods Pro च्या पुढील व्हर्जनमध्ये हेल्थ ट्रॅकिंगचे अडव्हान्सड फीचर्स समाविष्ट करणार आहे. यानंतर यूझर्सना ताप वगैरे तपासणे सोपे होईल.

advertisement

Apple यूझर्ससाठी गुडन्यूज! लवकरच लॉन्च होऊ शकतो नवीन iPad

ॲपल वॉचने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत

ॲपल वॉचने आपल्या हेल्थ ट्रॅकिंग फीचरच्या मदतीने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत. यात अनेक फीचर आहेत जी आपोआप काम करतात. अशा परिस्थितीत यूझर बेशुद्ध झाला किंवा अपघात झाला तर घड्याळ आपोआप घरी रुग्णवाहिका इत्यादी घरी बोलवू शकते.

advertisement

Airpodsमध्ये कॅमेरा असेल का?

याआधीही Apple AirPods Pro बद्दल माहिती समोर आली होती की कंपनी त्यात कॅमेरा बसवण्याचा विचार करत आहे, खरंतर गुरमनने सांगितले की कॅमेरा सह AirPods लाँच होण्यासाठी अजून बराच वेळ आहे. याबाबत कोणतीही टाइम लाइन उघड झालेली नाही.

Redmi पासून ते OnePlus पर्यंत, जानेवारीत लॉन्च होणार भारी 5 स्मार्टफोन

advertisement

Apple AirPods मध्ये हे खास फीचर आहे

Apple ने यावर्षी आयोजित कार्यक्रमादरम्यान आपला AirPods Pro 2 देखील सादर केला. लॉन्च दरम्यान, कंपनीने सांगितले होते की त्यांनी एअरप्रॉड्स प्रो मध्ये हिअरिंग एड फीचर समाविष्ट केले आहे. अशा परिस्थितीत जे मोठ्या आवाजात ऐकतात ते चांगले आणि स्पष्ट ऐकण्यासाठी याचा वापर करू शकतात. या प्रोडक्टला FDA सर्टिफिकेशन प्राप्त झाले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

AirPods Pro 2 Amplify ची फ्रीक्वेंसी वाढवेल. ज्यामुळे हे उत्पादन कमी श्रवणशक्ती असलेल्या लोकांसाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकते. यासाठी डिव्हाइसमध्ये iOS 18.1 असणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Apple करतेय मोठी तयारी! हार्ट रेट आणि तापेची माहिती देईल इअरबड्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल