advertisement

Apple यूझर्ससाठी गुडन्यूज! लवकरच लॉन्च होऊ शकतो नवीन iPad

Last Updated:

Apple 2025 च्या सुरुवातीला 11व्या जेनरेशन आयपॅड बाजारात आणू शकते. बेस आयपॅड हे एकमेव मॉडेल होते जे 2024 मध्ये अपडेट केले गेले नव्हते. iPad 11व्या पिढीचे मॉडेल iPadOS 18.3 प्री-इंस्टॉल केलेले असेल.

अॅपल आयपॅड
अॅपल आयपॅड
मुंबई : Apple 2025 च्या सुरूवातीला बाजारात 11व्या जनरेशनचा iPad लाँच करू शकते. ज्यामध्ये Apple Intelligence ची फीचर्स समाविष्ट असू शकतात. कंपनीने 2024 मध्ये अनेक उपकरणे अपडेट केली आणि जवळपास सर्व iPads रिफ्रेश केले. iPad Mini मध्ये देखील अपडेट केले आहे. परंतु कंपनीने iPad च्या 10 व्या मॉडेलमध्ये कोणतेही अपडेट केले नाही.
9to5Mac च्या रिपोर्टनुसार, Apple 2025 च्या सुरुवातीला 11व्या जनरेशनचा iPad लाँच करण्याची योजना आखत आहे. हा iPad iPadOS 18.3 सह लॉन्च केला जाऊ शकतो. कारण सध्या Apple च्या iPad मध्ये iPadOS 18.2 सॉफ्टवेअर आहे आणि कंपनीने नुकतेच iPadOS 18.3 ची पहिली डेव्हलपर बीटा व्हर्जन जारी केली आहे. हे नवीन अपडेट जानेवारी 2025 मध्ये आणले जाण्याची अपेक्षा आहे. आणि असा अंदाज लावला जात आहे की iPad 11 व्या जनरेशन मॉडेलमध्ये iPadOS 18.3 प्री-इंस्टॉल केलेले असेल.
advertisement
iPad 11व्या जनरेशनमध्ये फीचर्स
ॲपलने आयपॅडमध्ये कोणतेही मोठे बदल करणे अपेक्षित नाही. नवीन आयपॅडचा लूक जुन्या मॉडेलप्रमाणेच राहणार असल्याचे मानले जात आहे. तसंच, iPad 11 मध्ये वेगवान चिप असणे अपेक्षित आहे. जे कदाचित A17 Pro असू शकते. A17 Pro ही अॅपल इंटेलिजेंसला शक्ती देणारी एंट्री-लेव्हल चिप आहे. जी iPad मिनीच्या 2024 मॉडेल्समध्ये तसेच iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये आहे. Apple Intelligence साठी सपोर्ट म्हणजे आगामी iPad मध्ये किमान 8GB RAM असेल. जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर Apple iPad 11 जनरेशनची किंमत 35,000 रुपये असू शकते. या आयपॅडची किंमत याच श्रेणीत राहिली, तर ते ॲपल इंटेलिजेंस सेवा स्वस्त दरात पुरवणारे उपकरण असेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Apple यूझर्ससाठी गुडन्यूज! लवकरच लॉन्च होऊ शकतो नवीन iPad
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement