advertisement

250 KM प्रवास करून नाशिकहून जेजुरीत आला भाविक; पण खंडोबाचं दर्शन घ्यायचं राहिलं, गड चढतानाच मृत्यू गाठलं

Last Updated:

नाशिकहून जेजुरी गडावर दर्शनासाठी आलेले संजय थेटे कडेपठार मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढत होते. अर्ध्या वाटेत असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले

खंडोबाचं दर्शन घेण्याआधीच गेला जीव (जेजुरी-फाईल फोटो)
खंडोबाचं दर्शन घेण्याआधीच गेला जीव (जेजुरी-फाईल फोटो)
पुणे : नाशिकहून खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताची दर्शन घेण्याची इच्छाही कायमची अपूर्णच राहिली. तीर्थक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाच्या कडेपठार गडावर दर्शनासाठी जात असतानाचा एका भाविकावर काळाने घाला घातला. या भाविकाचा गडावर चढतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संजय महादू थेटे (वय ५५, रा. उम्राळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे मृत भाविकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दर्शनासाठी गड चढत असताना घडली.
पायरी मार्गावरच प्रकृती बिघडली
नाशिकहून जेजुरी गडावर दर्शनासाठी आलेले संजय थेटे कडेपठार मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढत होते. अर्ध्या वाटेत असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी गडावर उपस्थित असलेल्या श्री कडेपठार देवसंस्थानच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखले. मयूर खोमणे, शिवाजी भंडलकर, अनिकेत कुदळे आणि धनंजय नाकाडे यांनी तातडीने त्यांना पायरी मार्गाने खाली आणले.
advertisement
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
श्री मार्तंड देवसंस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक प्रतीक वखरे यांनी त्यांना तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती संजय थेटे यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. जेजुरी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.
advertisement
जेजुरीमध्ये सध्या कडाक्याचे ऊन आणि गडाची अवघड चढण यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न वारंवार समोर येत आहे. नाशिकच्या या भाविकाच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि उम्राळे गावावर शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
250 KM प्रवास करून नाशिकहून जेजुरीत आला भाविक; पण खंडोबाचं दर्शन घ्यायचं राहिलं, गड चढतानाच मृत्यू गाठलं
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement