Visual Intelligence म्हणजे काय?
अॅपल इंटेलिजेंस फीचर विशेषतः आयफोन 16 लाइनअपसाठी सादर करण्यात आले आहे आणि तुम्ही ते कॅमेरा कंट्रोल बटणावरून वापरू शकता. तुम्ही कॅमेरा कंट्रोल दीर्घकाळ होल्ड करुन ते लाँच करू शकता आणि नंतर तुम्ही जे पहात आहात त्याचा फोटो काढा. ज्यानंतर तुम्ही फोटोमध्ये उपलब्ध कोणत्याही गोष्टीची माहिती थेट ChatGPT वरुन घेऊ शकता. गुगल सर्च करु शकता किंवा फोटोमध्ये कोणताही टेक्स्ट हायलाइट करु शकता.
advertisement
Flipkartच्या सेलमध्ये सॅमसंगच्या या फोनवर बंपर डिस्काउंट! होईल मोठी बचत
तुम्ही Google Lens सारख्या व्हिज्युअल इंटेलिजेंसचा विचार करू शकता. परंतु ते Google Lens पेक्षा खूप प्रगत आहे. आम्ही स्वतः याची चाचणी केली आणि आमचा एक जुना फोन समोर ठेवला. त्यानंतर Apple Intelligence ने आम्हाला फोनबद्दल सर्व माहिती दिली. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की हे साधन किती शक्तिशाली आहे आणि तुमचे काम सोपे करण्यासाठी ते किती काम करू शकते.
2 फोनमध्ये एकच WhatsApp अकाउंट कसं चालवायचं? जाणून घ्या सोपी प्रोसेस
कॅमेरा कंट्रोल काम सोपे कसे करते?
तुम्ही व्हिज्युअल इंटेलिजन्स कुठूनही लाँच करू शकता, अगदी लॉक स्क्रीनवरूनही. ही टेक्नॉलॉजी अद्याप बीटा फेजमध्ये आहे. व्हिज्युअल इंटेलिजेंसचा आणखी एक चांगला उपयोग म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर असाल आणि दुकान, कॅफे, बार किंवा रेस्टॉरंटबद्दल माहिती पाहू इच्छित असाल. यावरून हे स्पष्ट होते की Apple ने नवीन iPhones मध्ये कॅमेरा कंट्रोल बटण का जोडले आहे कारण सामान्य फोटो काढताना, हे बटण तितकेसे उपयुक्त वाटत नाही कारण त्याची प्लेसमेंट खालच्या बाजुला केली आहे.
Visual Intelligence आपल्या iPhone मध्ये कसे ऑन करावे?
- यासाठी तुम्हाला तुमच्या आयफोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला General ऑप्शन निवडावा लागेल.
- आता भाषा आणि रीजनमध्ये जा आणि रीजन यूनायटेड स्टेटवर सेट करा.
- आता तुम्हाला पुन्हा मेन मेनूवर यावे लागेल आणि Apple Intelligence या ऑप्शनवर जावे लागेल.
- येथे तुम्हाला पहिला ऑप्शन ऑन करावा लागेल.
- यास थोडा वेळ लागेल कारण फोन प्रथम AI फीचर्स डाउनलोड करेल.
- किमान अर्धा तास तरी थांबावे लागेल.
काही काळानंतर, Apple Intelligence ऑप्शन ऑन होईल आणि तुम्ही हे AI फीचर आनंदाने वापरू शकता.
