Flipkartच्या सेलमध्ये सॅमसंगच्या या फोनवर बंपर डिस्काउंट! होईल मोठी बचत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Flipkart Sale Samsung Smartphone Deals: तुम्ही 10 ते 30 हजार रुपयांच्या किंमतीमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सॅमसंगचे हे तीन डिव्हाइस चेक करु शकता. ज्यावर सध्या बंपर डिस्काउंट मिळत आहेत.
Flipkart Big Saving Days Sale Samsung Smartphone Deals: ख्रिसमससाठी फक्त काही दिवस बाकी आहेत, त्यापूर्वी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या प्लॅटफॉर्मवर “बिग सेव्हिंग डेज” सेल सुरू केलाय. हा सेल 20 डिसेंबरपासून सुरू झाला असून 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सेल इव्हेंटमध्ये अनेक प्रकारच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट पाहायला मिळत आहे. सॅमसंगचे प्रिमियम फोनही सेल दरम्यान अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. तुम्हीही खूप दिवसांपासून नवीन सॅमसंग फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे 3 बेस्ट डील पाहू शकता. सेलमध्ये सॅमसंग फोनवर 49 हजार रुपयांपर्यंत थेट सूट उपलब्ध आहे. चला या बेस्ट डील्सविषयी जाणून घेऊया.
SAMSUNG Galaxy S23 FE
सॅमसंगचा Galaxy S23 FE, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये लॉन्च झाला होता. तो फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन फक्त 30,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर या फोनची खरी किंमत 79,999 रुपये आहे. तुम्हाला कोणत्याही बँक ऑफरशिवाय फोनवर थेट 49 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ज्यामुळे ही एक उत्तम डील आहे. एवढेच नाही तर या फोनवर नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील उपलब्ध आहे. जिथून तुम्ही दरमहा केवळ 3,445 रुपये भरून डिव्हाइस घरी आणू शकता.
advertisement
SAMSUNG Galaxy M35 5G
तुम्ही 15 ते 20 हजारांच्या बजेटमध्ये चांगला सॅमसंग फोन शोधत असाल, तर SAMSUNG Galaxy M35 5G हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. ज्याची किंमत सध्या 15,570 रुपये आहे. कंपनी या फोनवर 36% पर्यंत सूट देत आहे. या किमतीत हा 'मॉन्स्टर' फोन असल्याचे दिसते कारण यात 6000 mAh बॅटरी आहे. तसेच, डिव्हाइसमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. या डिव्हाइसवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. परंतु यासाठी तुम्हाला Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरावे लागेल.
advertisement
SAMSUNG Galaxy A14 5G
लिस्टच्या शेवटच्या फोनबद्दल बोलायचे झाल्यास, हा सॅमसंगचा एंट्री लेव्हल 5G फोन आहे. जो तुम्ही आता 47% पर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता. सेलमध्ये या फोनची किंमत 10,999 रुपये झाली आहे. म्हणजेच या फोनवर त्याच्या लॉन्च किंमतीपासून थेट 10,000 रुपयांची सूट मिळत आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे या फोनवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2024 11:52 AM IST









