Tata Sierra चा थेट भिडणार, Mahindra करणार मोठा धमाका, आणतेय स्वस्त हायटेक SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
महिंद्रा मोटर्सने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकच धडाका लावला आहे. एकापाठोपाठ दमदार अशा एसयूव्ही पेट्रोल आणि ईव्ही सेगमेंटमध्ये लाँच केल्या आहेत. आता 2026 मध्ये महिंद्रा नवीन मॉडेल्स घेऊन येणार आहे.
मागील काही वर्षांपासून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये फार मोठे बदल पाहण्यास मिळाले आहे. आता कारच्या किंमतीत एसयूव्ही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे महिंद्रा मोटर्सने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकच धडाका लावला आहे. एकापाठोपाठ दमदार अशा एसयूव्ही पेट्रोल आणि ईव्ही सेगमेंटमध्ये लाँच केल्या आहेत. आता 2026 मध्ये महिंद्रा नवीन मॉडेल्स घेऊन येणार आहे. यात Mahindra Scorpio N-Based Pickup, Scorpio N Facelift, Mahindra Vision S आणि Mahindra XUV 3XO CNG लाँच होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
Mahindra Scorpio N-Based Pickup ही एक पिकअप सेगमेंटमध्ये एसयूव्ही असणार आहे. Global Pik Up 2023 मध्ये या गाडीची झलक पाहण्यास मिळाली होती. ही एक लाइफस्टाइल पिकअप ट्रक असणार आहे. जे अ‍ॅडव्हेंचर आणि ग्रामीण भागात फॅमिलीसाठी बेस्ट असणार आहे. अलीकडेच या गाडीची टेस्ट सुरू झाली आहे. ही गाडी Scorpio N SUV पेक्षा जास्त लांब आणि मजबूत असणार आहे. ड्युअल-कॅब डिझाईनसह हे मॉडेल Scorpio N ची स्टाईल पुढे करेल. यात 2.2-लिटर डिझेल इंजिन दिलं आहे जे 175 बीएचपी पॉवर आणि 200 hp चा टार्क जनरेट करेल.
advertisement
ही गाडी पेट्रोल सेगमेंटमध्येही येईल, या ट्रॅकमध्ये 4x4 सिस्टम आणि लो-गिअरिंग ऑफ-रोडिंगसाठी उत्तम असेल. फीचर्समध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रीमियम इंटिरियर असेल. Mahindra Scorpio N-Based Pickup ची किंमत अंदाजे 20 ते 27 लाख एक्स-शोरूम इतकी असण्याची शक्यता आहे, २०२६ च्या वर्षाअखेरीस लाँच होईल.
advertisement
advertisement
फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर 10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS फिचर्स असेल. इंजिन हे 2.0 लिटर टर्बो-पेट्रोल 200 बीएचपी आणि 2.2-लीटर डिझेल 175 बीएचपी जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्हीमध्ये RWD/4WD पर्यायांसह येईल. Scorpio N ची किंमत अंदाजे 14 ते 24 लाखांच्या दरम्यान असेल.
advertisement
advertisement






