advertisement

IPL 2026 : धोनी नाही तर कॅरेबियन खेळाडूने घातक बनवलं, कल्याणचा तुषार देशपांडे कसा झाला डेथ ओव्हर किंग?

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध 6 रननी थरारक विजय मिळवला आहे. कल्याणचा तुषार देशपांडे राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

धोनी नाही तर कॅरेबियन खेळाडूने घातक बनवलं, कल्याणचा तुषार देशपांडे कसा झाला डेथ ओव्हर किंग?
धोनी नाही तर कॅरेबियन खेळाडूने घातक बनवलं, कल्याणचा तुषार देशपांडे कसा झाला डेथ ओव्हर किंग?
अहमदाबाद : आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध 6 रननी थरारक विजय मिळवला आहे. राजस्थानने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरमध्ये 204/8 एवढा स्कोअर करता आला. मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी फक्त 11 रनची गरज होती आणि क्रीजवर राशिद खान आणि कागिसो रबाडा होते. 19 वी ओव्हर संपली तेव्हा राशिद 13 बॉल 23 आणि रबाडा 14 बॉल 21 रनवर खेळत होता.
रबाडा आणि राशिद खेळपट्टीवर सेट झाले होते, त्यामुळे दोघांना 11 रन अगदी सहज पार करता येतील, असं वाटत होतं. पण राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने तुषार देशपांडे याच्या हातात बॉल दिला. संदीप शर्मा आणि नांद्रे बर्गर या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या एक-एक ओव्हर शिल्लक असतानाही रियान परागने तुषार देशपांडे याच्यावर विश्वास दाखवला आणि तुषारनेही त्याच्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला.
advertisement
20 व्या ओव्हरचा पहिल्या बॉल तुषारने वाईड टाकला, त्यानंतर गुजरातला 6 बॉलमध्ये विजयासाठी फक्त 10 रनची गरज होती. यानंतर पुढच्या 3 बॉलला तुषार देशपांडेने प्रत्येकी 1-1 अशा 3 रन दिल्या तर चौथा बॉल डॉट आणि पाचव्या बॉलला राशिद खानची विकेट घेतली, त्यामुळे गुजरातला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 7 रनची गरज होती, तेव्हा तुषार देशपांडेने भेदक बॉल टाकून एकही रन दिली नाही.
advertisement
शेवटच्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने फक्त 4 रन दिल्या, यातले बहुतेक बॉल हे यॉर्कर होते. या सामन्याची कॉमेंट्री करत असताना वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयन बिशप यांनी तुषार देशपांडे इतका भेदक कसा झाला? याचा उल्लेख केला.
मूळचा कल्याणचा आणि मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा तुषार देशपांडे आयपीएलचे बरेच मोसम चेन्नई सुपरकिंग्सकडे होता. सीएसकेकडून खेळत असताना वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो हा कोच होता. ब्राव्होकडून तुषार देशपांडेने डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर, स्लो यॉर्कर आणि डेथ ओव्हरसाठी गरजेची असलेली व्हेरिएशन शिकली, असं इयन बिशप यांनी कॉमेंट्री करताना सांगितलं.
advertisement

तुषार देशपांडे विजयाचा हिरो

या सामन्यात राजस्थानचा फास्ट बॉलर रवी बिष्णोई याने 4 विकेट घेतल्या असल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये 11 रन रोखून तुषार देशपांडेने राजस्थानला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. या विजयासोबतच राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने 2 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवले आहेत. याआधी राजस्थानने पहिल्या सामन्यात सीएसकेला पराभवाची धूळ चारली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : धोनी नाही तर कॅरेबियन खेळाडूने घातक बनवलं, कल्याणचा तुषार देशपांडे कसा झाला डेथ ओव्हर किंग?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement