नवीन वर्षात खरेदी करा हे स्मार्टफोन्स, 15 हजारांच्या आत मिळतील भरपूर फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनमध्ये Samsung, Realme आणि Nothing यासह अनेक कंपन्यांचे चांगले फोन सामिल आहेत. यामध्ये मोठ्या स्क्रीन, मजबूत बॅटरी आणि चांगले प्रोसेसर आहेत.
Smartphones Under 15K: तुम्ही स्वत:साठी बजेट स्मार्टफोन शोधत असाल किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने एखाद्या मित्राला गिफ्ट द्यायला असाल तर अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. Samsung, Realme आणि Nothing सारख्या कंपन्या बजेट सेगमेंटमध्ये अनेक फोन ऑफर करतात. या फोनमध्ये सर्व आवश्यक फीचर्स उपलब्ध आहेत आणि तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागत नाहीत. आज आम्ही तुम्हाला 15000 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या फोनबद्दल सांगणार आहोत.
Samsung Galaxy M35 5G
या फोनमध्ये 1080 x 2340 रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंच सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याच्या प्रोटेक्शनसाठी, ते कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ ने सुसज्ज आहे. हा फोन Exynos 138 प्रोसेसर सह येतो. कंपनी 4 जनरेशन अँड्रॉइड अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देईल. यात 50MP मेन वाइड अँगल कॅमेरा आहे. त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह व्हेरिएंटची किंमत Amazon वर 14,999 रुपये आहे. यावर कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफर उपलब्ध आहेत.
advertisement
CMF BY NOTHING Phone 1 5G
या फोनमध्ये 120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात 50MP मुख्य सेन्सर आणि मागील बाजूस पोर्ट्रेट सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात 16MP कॅमेरा आहे. यात 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर ते MediaTek Dimension 7300 5G ने सुसज्ज आहे. त्याचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 14,325 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्ही बँक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकता.
advertisement
Vivo T3x 5G
Vivo चा हा स्मार्टफोन 6.72 फुल HD+ डिस्प्ले सह येतो. यात मागील बाजूस 50MP + 2MP सेन्सर आहेत, तर सेल्फी प्रेमींसाठी, हे 8MP फ्रंट कॅमेरासह येतात. यात 6000 mAh ची बॅटरी आहे. त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जनची Amazon वर किंमत 14,449 रुपये आहे. यावर बँक ऑफर आणि इतर डील देखील मिळू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2024 6:46 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
नवीन वर्षात खरेदी करा हे स्मार्टफोन्स, 15 हजारांच्या आत मिळतील भरपूर फीचर्स









