फक्त 799 रुपयांत मिळताय भारी Earbuds, 45 तास चालते बॅटरी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Amazon Best Deals On Earbuds: तुम्हीही खूप दिवसांपासून स्वस्त आणि उत्तम इयरबड्स शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला 3 बेस्ट ऑप्शन सांगणार आहोत. या बड्समध्ये तुम्हाला 45 तास चालणारी पॉवरफुल बॅटरी मिळत आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
Amazon Best Deals On Earbuds: तुम्हीही खूप दिवसांपासून उत्तम इयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि तुमचे बजेट 1000 रुपयांपेक्षा कमी आहे, तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या स्वस्त इयरबड्सबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या चांगल्या आणि स्वस्त इअरबड्सची यादी तयार केली आहे. यामध्ये बोल्ट ते boAt पर्यंतचे इअरबड्स समाविष्ट आहेत जे सध्या फक्त 799 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर या बड्समध्ये तुम्हाला एक शक्तिशाली बॅटरी देखील मिळत आहे जी 45 तास टिकते, जी त्यांना आणखी खास बनवते. चला या इयरबड्सची लिस्ट पाहूया…
Boult Audio W20 Truly Wireless in Ear Earbuds
हे बोल्टचे इअरबड्स तुम्ही आता Amazon वरून फक्त 799 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या बड्समध्ये तुम्हाला 35 तासांची बॅटरी लाइफ मिळतेय. तसेच, ENC माइक आणि 45ms लो लेटन्सी मोड बडमध्ये दिसू शकतात, जे त्यांना आणखी खास बनवतात. बड्समध्ये 13 मिमी बास ड्रायव्हर आणि टाइप-सी फास्ट चार्जिंगची सुविधा देखील आहे.
advertisement
boAt [New Launch] Airdopes 91 Prime
सध्या अमेझॉनवर बोटचे इअरबड्सही अतिशय स्वस्तात मिळतात. आता तुम्ही 80% पर्यंत सूट देऊन फक्त 798 रुपयांमध्ये हे खरेदी करु शकता. खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 45 तासांची बॅटरी लाइफ मिळत आहे. बड्समध्ये 13 मिमी ड्रायव्हर्स आहेत जे साउंड क्वालिटी वाढवतात. या बड्समध्ये लो लेटन्सी मोड आणि फास्ट चार्ज, ब्लूटूथ v5.3 देखील दिसतात.
advertisement
Mivi DuoPods i2 True Wireless Earbuds
Mivi बड्स 800 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. Amazon 73% पर्यंत सूट देऊन हे बड्स फक्त 799 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या बड्समध्ये तुम्हाला 45 तासांपेक्षा जास्त प्ले बॅक टाइम मिळत आहे. एचडी कॉल क्वालिटी, फास्ट चार्जिंग, टाइप सी आणि 13 मिमी बास ड्रायव्हर्स बडमध्ये उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर हे बड्स IPX 4.0 स्वेट प्रूफ देखील आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2024 5:41 PM IST









