स्मार्टवॉच हे केवळ वेळ सांगणारे घड्याळ नाही, तर ते एखाद्या व्यक्तीसाठी चालते-फिरते फिटनेस ट्रॅकर म्हणूनही काम करते. जर तुम्ही स्वतःसाठी एक चांगले आणि स्वस्त स्मार्टवॉच शोधत असाल, ज्याची किंमत 3,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टवॉच ऑप्शन्सबद्दल सांगत आहोत.
लॅपटॉप खरेदी करायचाय? हे आहेत 40 हजारांच्या आतील बेस्ट ऑप्शन्स
advertisement
REDMI Watch 3 Active
Redmi च्या या घड्याळात 1.83 इंच डिस्प्ले आहे. ज्याची कमाल ब्राइटनेस 450 nits आहे. यामध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.3 वापरण्यात आले आहे, त्यामुळे या घड्याळासोबत तुमचा कॉलिंग आणि कनेक्टिव्हिटीचा अनुभव खूप चांगला असेल. हे घड्याळ हार्ट रेट, SpO2 level, Calories, स्टेप्स ट्रॅक करू शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, हे घड्याळ 5ATM वॉटरप्रूफ आहे, यामध्ये 200 पेक्षा जास्त वॉच फेसेस उपलब्ध आहेत.
Noise Caliber 3 Plus
या वॉचची रचना खूपच प्रीमियम आहे. मग तो त्याचा 1.96 इंचाचा AMOLED डिस्प्ले असो, त्याची अतिशय सुंदर Flat Design असो किंवा त्याची मेटलिक डिझाइन असो. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग ट्रू सिंकची मदत आणखी सुधारण्यात आली आहे. यासोबतच घड्याळात व्हॉईस असिस्टंटही देण्यात आला आहे, जेणेकरून ते सहज चालेल. याला IP67 रेटिंग देखील आहे, ज्यामुळे घड्याळ काही प्रमाणात वॉटरप्रूफ देखील आहे. त्याचा UI चांगला आहे. 150+ वॉच फेससोबत स्टेप्स ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर, कॅलरी ट्रॅकर, स्ट्रेस ट्रॅकर यासारख्या गोष्टीही या घड्याळात समाविष्ट आहेत.
तुमच्या फोनमध्ये आहे सोनं! पाहा कोणकोणत्या उपकरणांमध्ये होतो वापर
boAt Wave Spectra 2.04
ज्या ग्राहकांना स्टायलिश घड्याळ हवे आहे त्यांच्यासाठी Boat चे हे घड्याळ खूप चांगले आहे. यात 2.04 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये खूप कमी बेझल आणि 550 nits ची पीक ब्राइटनेस आहे. या वॉचचे स्टॅप्स देखील धातूचे बनलेले आहेत आणि जर तुम्हाला कॉलवर खूप बोलायचे असेल तर या घड्याळाचा माइक खूपच चांगला आहे. यासोबतच तुम्हाला स्टेप ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर, कॅलरीज ट्रॅकर देखील मिळतात. यातील एक खास गोष्ट म्हणजे हे घड्याळ IP68 वॉटरप्रूफ रेटिंगसह येते. तसेच, 100+ वॉच फेस आणि स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत.
या सर्व स्मार्टवॉचची किंमत सुमारे 3000 रुपये आहे. तुम्ही ऑफरसह अगदी कमी किमतीत ते खरेदी करू शकता.