TRENDING:

BSNL चा मोठा प्लॅन! लॉन्च करणार eSIM, पहा कधी होणार उपलब्ध

Last Updated:

गेल्या आठवड्यात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले होते की कंपनीची आर्थिक वसुली सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच eSIM लाँच करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, पुढील वर्षी जूनपर्यंत त्यांचे 4G नेटवर्क देशभरात उपलब्ध होईल. यानंतर कंपनी 5G नेटवर्क लॉन्च करण्याची योजना आखत आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे कमी दर हे याचे कारण आहे.
बीएसएनएल
बीएसएनएल
advertisement

भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ सारख्या मोठ्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे 5G नेटवर्क देशाच्या मोठ्या भागात आहेत. या बाबतीत बीएसएनएल या कंपन्यांच्या मागे आहे. BSNL ने पुढील वर्षी मार्चपर्यंत eSIM सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर जूनपर्यंत देशभरात 4G नेटवर्क उपलब्ध करून दिले जाईल. कंपनी लवकरच दर वाढवण्याच्या विचारात नाही.

advertisement

फोनमध्ये इंटरनेट नीट चालत नाहीये? या ट्रिकने दूर होईल प्रॉब्लम

गेल्या आठवड्यात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले होते की, कंपनीची आर्थिक वसुली सुरू आहे. BSNL ने पुढील वर्षाच्या मध्यात 5G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. सिंधिया म्हणाले होते की, बीएसएनएलचे कामकाज अधिक मजबूत होत आहे. भारतासारख्या देशासाठी तीन-चार टेलिकॉम कंपन्या असणे अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणाले, "गेल्या तीन-चार वर्षांत कंपनीच्या महसुलात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा खर्च दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून कंपनी EBITDA च्या बाबतीत सकारात्मक आहे. बीएसएनएलचे ऑपरेटिंग प्रॉफिट वाढून सुमारे 2,300 रुपये झाली आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत एक लाख टॉवर बसवण्याची कंपनीची योजना आहे.

advertisement

Jio बेस्ट एंटरटेनमेंट प्लॅन पाहिलाय का? मिळतात 10 पेक्षाही जास्त OTT सब्सक्रिप्शन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

अलीकडेच संसदेच्या एका पॅनलने बीएसएनएलला स्वदेशी टेक्नॉलॉजी सुधारेपर्यंत परदेशी कंपन्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. जगात असे फक्त चार देश आहेत ज्यांच्याकडे मोबाईल नेटवर्क सुरू करण्यासाठी स्वतःचे तंत्रज्ञान स्टॅक आहे. केंद्र सरकारला या देशांच्या यादीत भारताचा समावेश करायचा आहे. संसदीय समितीने BSNL ला 4G नेटवर्कबाबत तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. या पॅनेलचे म्हणणे आहे की, कंपनीने स्वदेशी 4G स्टॅक वापरण्यात तसेच संबंधित उपायांची चाचणी घेण्यात कौशल्य असलेल्या परदेशी कंपन्यांची मदत घ्यावी. या नेटवर्कसाठी टेक्नॉलॉजी टाटा समूहाच्या आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नेतृत्वाखालील संघाद्वारे BSNL ला प्रदान केले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
BSNL चा मोठा प्लॅन! लॉन्च करणार eSIM, पहा कधी होणार उपलब्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल