Jio बेस्ट एंटरटेनमेंट प्लॅन पाहिलाय का? मिळतात 10 पेक्षाही जास्त OTT सब्सक्रिप्शन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Reliance Jio Entertainment Plan: आपण जिओच्या एका प्लॅनविषयीजाणून घेऊया. जो तुम्हाला कमी किमतीत 10 पेक्षा जास्त OTT चे मोफत सब्स्क्रिप्शन प्रदान करते.
Reliance Jio Recharge Plan: तुम्ही जिओ यूझर्स असाल आणि तुमच्यासाठी चांगला एंटरटेनमेंट प्लॅन शोधत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आपण जिओच्या एका प्लॅनबद्दल जाणून घेऊया जो तुम्हाला कमी किमतीत 10 पेक्षा जास्त OTT चे फ्री सब्स्क्रिप्शन प्रदान करतो. हा Jio चा एक अतिशय लोकप्रिय एंटरटेनमेंट प्लॅन आहे. चला डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
जिओचा बेस्ट एंटरटेनमेंट प्लॅन
Jio आपल्या यूझर्सला वेगवेगळ्या प्राइज रेंटमध्ये अनेक असे प्लॅन ऑफर करते ज्यामध्ये वेगवेगळे बेनिफिट्स मिळतात. तुम्हाला जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन मिळतील. यापैकी एका प्लॅनची किंमत 175 रुपये आहे. जिओच्या वेबसाइटवरील एंटरटेनमेंट विभागात तुम्हाला हा प्लॅन मिळेल. जिओचा हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅन अंतर्गत, यूझर्सना एकूण 10 GB हायस्पीड डेटा मिळतो, जो ते ऑनलाइन कंटेंट पाहण्यासाठी वापरू शकतात.
advertisement
प्लॅनचे खास फीचर्स
या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये यूजरला 10 पेक्षा जास्त OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये यूझर्सला Sony Liv, Zee5, Jio Cinema Premium, Lionsgate Play, Discovery Plus, Sun NXT, Kancha Lannaka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi आणि Jio TV सारख्या प्लॅटफॉर्मचे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. यासह यूझर्सना 28 दिवसांचे Jio Cinema Premium सबस्क्रिप्शन देखील मिळते, ज्याचे कूपन थेट त्यांच्या MyJio खात्यात जमा केले जाते.
advertisement
टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमध्ये वाढ
काही काळापूर्वी रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. कंपनीने पोर्टफोलिओ अपडेट करताना टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2024 12:39 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio बेस्ट एंटरटेनमेंट प्लॅन पाहिलाय का? मिळतात 10 पेक्षाही जास्त OTT सब्सक्रिप्शन









