कुणालाही फोन देताय तर 3 गोष्टी जरूर करा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
तुम्ही जर कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा अनोळखी लोकांना तुमचा फोन देत असाल तर त्याआधी तीन गोष्टी करायला पाहिजे.
मागच्या काही वर्षांत स्मार्टफोन हा लोकांच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. फोनशिवाय जीवन जगणं अनेकांना असह्य झालं आहे. फोनने पेमेंट करणं, शॉपिंग करणं, बिल भरणं या गोष्टी घरबसल्या शक्य झाल्या आहेत. त्यामुळे जवळ कॅश नसेल तरीही लोक फोन घेऊन बाहेर पडतात. कधी प्रवासात किंवा बाहेर गेल्यावर फोनमध्ये चार्जिंग नाही, किंवा बॅलन्स नाही असं कारण सांगून लोक फोन करण्यासाठी मोबाईल मागतात. काही जण मागचापुढचा विचार न करता फोन देऊन मदत करतात. पण असं करण्याआधी सावध राहायला पाहिजे.
तुम्ही जर कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा अनोळखी लोकांना तुमचा फोन देत असाल तर त्याआधी तीन गोष्टी करायला पाहिजे. यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहिल, तो हॅक होण्याची भीती राहणार नाही.
एक कोड टाकल्याने तुमच्या फोनमधील ॲप्सची मिळेल माहिती
सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये एक सीक्रेट कोड टाकावा लागेल, असं केल्याने तुमच्या फोनमध्ये कोणी ॲप इन्स्टॉल केले आहे की नाही हे तुम्हाला कळेल. हा कोड टाकल्यानंतर, आता तुमच्या फोनमध्ये कोणते ॲप्स युज होत आहेत आणि जुनी ॲप्स कधी वापरली गेली आहेत हे सगळं तिथे दिसेल. एवढंच नाही तर तुम्हाला तिथे तारीख आणि वेळेसह त्या ॲपची सगळी माहिती मिळेल. हे तपासण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
advertisement
फॉलो करा खाली दिलेल्या स्टेप्स
यानंतर सर्वात आधी तुमच्या फोनचं डायल पॅड ओपन करावे लागेल.
यानंतर तुम्ही डायल पॅडवर *#*#4636#*# टाइप करून डायल करा.
हे डायल केल्यावर तुम्हाला त्या सगळ्या ॲप्सची लिस्ट दिसेल जे सुरू आहेत किंवा जे आता वापरून बंद केली आहेत.
कॉलिंग डिटेल्स
कोणीतरी तुमचे कॉल स्वतःच्या नंबरवर फॉरवर्ड तर केले नाही ना, हे तुम्हाला दुसऱ्या कोडमधून कळेल. त्यासाठी तुम्हाला डायलपॅडवर जाऊन *#61# हा कोड एंटर करायचा आहे. इथे तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिसतील.
advertisement
जर तुमचे कॉल फॉरवर्ड ऑन दिसत असेल तर ##002# डायल करून तुम्हाला ते बंद करता येऊ शकते. तसेच हा कोड टाकल्यावर तुमच्या जेवढ्या कॉल फॉरवर्ड केलेल्या आहेत त्या सगळ्या डिलीट होतील. हे केल्यावर तुमचे डिव्हाइस आणखी जास्त सिक्युअर होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2024 10:54 PM IST








