फसवणूक करणारे बनावट कॉल्स आणि SMS कसे वापरतात?
सायबर गुन्हेगार बनावट मेसेजेस किंवा ईमेल पाठवण्यासाठी खऱ्या बँकेचे नाव आणि लोगो वापरतात. मेसेजमध्ये असे म्हटले जाते की तुमचे खाते ब्लॉक होणार आहे. केवायसी अपडेट्स करणे आवश्यक आहे किंवा कार्ड व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्यानंतर ते तुम्हाला लिंकवर क्लिक करण्यास किंवा तुमचा ओटीपी देण्यास सांगतात. तुम्ही असे करताच, त्यांना तुमच्या सर्व बँक खात्याच्या माहितीत प्रवेश मिळतो.
advertisement
गिझरमध्ये पाणी लवकर गरमच होत नाही? या 5 सुपर ट्रिक्स येतील कामी
बनावट कॉल किंवा एसएमएस कसे ओळखावे
प्रथम, लक्षात ठेवा की कोणतीही बँक कधीही कॉल, ईमेल किंवा एसएमएसद्वारे तुमचा ओटीपी, पिन किंवा पासवर्ड विचारत नाही. जर एखाद्या मेसेजमध्ये लिंक असेल तर त्यावर क्लिक करू नका. खरे बँक मेसेज नेहमीच AXISBK, ICICIB, HDFCBK इत्यादी अधिकृत प्रेषक आयडीवरून येतात. जर मेसेज मोबाईल नंबरवरून आला असेल किंवा त्यात चुकीचे स्पेलिंग, लिंक्स किंवा संशयास्पद शब्द असतील तर ते बनावट आहे.
स्वतःचे संरक्षण कसे करावे
तुम्हाला कॉल किंवा ईमेलचा संशय आला असेल तर तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर थेट संपर्क साधा, कॉलरवर नाही. बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरच कोणतेही अपडेट पडताळून पहा. तसेच, तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर स्पॅम फिल्टर ठेवा.
Smartphone च्या स्पर्धेत कोणता ब्रँड टॉपवर? लिस्टपाहून तुम्हीही व्हाल चकीत
त्वरित रिपोर्ट करा
तुम्ही चुकून कोणतीही संवेदनशील माहिती शेअर केली असेल किंवा फसवणुकीचा बळी पडला असाल तर घाबरू नका. 1930 वर कॉल करून किंवा cybercrime.gov.in वेबसाइटला भेट देऊन ताबडतोब तक्रार दाखल करा. डिजिटल बँकिंग जितके सोयीस्कर आहे तितकेच ते जबाबदारीने वापरणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, सावधगिरी ही सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. कारण एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचे संपूर्ण बँक बॅलन्स संपू शकते.
