TRENDING:

WhatsApp मुळे Meta ला मोठा दणका, तब्बल 213 कोटींचा दंड, पण प्रकरण काय?

Last Updated:

सीसीआयच्या मते, कंपनीकडून सेवा देताना ‘अटी मान्य करा किंवा सोडून द्या’ असा दृष्टिकोन ठेवणं खूपच चुकीचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण या सेवा देणाऱ्या मेटा कंपनीला भारतीय प्रतिस्पर्धा आयोग अर्थात सीसीआयनं कोट्यावधी रुपयांचा दंड केलाय. हा दंड डेटा शेअरिंगच्या अनुषंगाने करण्यात आलाय.
News18
News18
advertisement

सीसीआयनं सोशल नेटवर्किंग कंपनी मेटाला तब्बल 213.14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 2021मध्ये कंपनीनं व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसी अपडेटच्या बाबतीत स्वतःच्या मजबूत स्थितीचा गैरवापर केल्यामुळे हा दंड करण्यात आलाय. सीसीआयच्या या आदेशामुळे मेटा कंपनीला त्यांचे सर्वांत मोठं ऑनलाईन युजर्सचं मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये मोठा धक्का बसलाय. भारतामध्ये मेटा कंपनीचे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यासर्वांचे मिळून जवळपास एक अब्जांपेक्षा जास्त युजर्स आहेत. एकट्या व्हॉट्सॲपचे भारतात 50 कोटींहून अधिक युजर्स आहेत.

advertisement

सीसीआयनं दिले महत्त्वाचे निर्देश

सीसीआयनं व्हॉट्सॲपला निर्देश दिलेत की, व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्मवर संकलित केलेला युजर्सचा डेटा हा मेटा कंपनी किंवा कंपनीच्या इतर उत्पादनाची जाहिराती करण्याच्या उद्देशानं पाच वर्षांपर्यंत शेअर करू नये. सीसीआयनं स्पष्ट केलं आहे की, ‘जाहिरातीव्यतिरिक्त इतर हेतूंसाठी युजरचा कोणताही डेटा हा मेटा कंपनी किंवा कंपनीच्या इतर प्रॉडक्टसाठी शेअर केला जात आहे का, याबाबत व्हॉट्सॲप पॉलिसीत स्पष्टपणे नमूद करण्यात यावे. यामध्ये डेटा शेअरिंगचा उद्देशही स्पष्टपणे नमूद करावा.’

advertisement

डेटाबाबत ठेवावी लागणार पारदर्शकता

सीसीआयच्या मते, कंपनीकडून सेवा देताना ‘अटी मान्य करा किंवा सोडून द्या’ असा दृष्टिकोन ठेवणं खूपच चुकीचं आहे. हे स्पर्धा कायद्याच्या अटींचं उल्लंघन आहे. दरम्यान, दंड करण्यासोबतच सीसीआयनं मेटा आणि व्हॉट्सॲपच्या कामकाजात बदल करण्याचे अनेक निर्देश दिलेत. यामध्ये व्हॉट्सॲप पुढील पाच वर्षांपर्यंत जाहिरातींच्या उद्देशानं मेटाशी कोणताही डेटा शेअर करणार नाही. व्हॉट्सॲप मेटाला दिलेला डेटा आणि त्याचा उद्देश याबाबत पारदर्शकता राखेल.

advertisement

म्हणून केला दंड

सीसीआयच्या मते, मेटा कंपनीला केलेला दंड व्हॉट्सॲपची 2021 मध्ये प्रायव्हसी पॉलिसी कशी लागू केली गेली? युजर्सचा डेटा कसा संकलित केला गेला? तो इतर मेटा कंपन्यांना कसा दिला गेला? याच्याशी संबंधित आहे. व्हॉट्सॲपनं जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या युजर्सला नवीन पॉलिसीबद्दल सूचित केलं होतं.

दरम्यान, डेटा शेअरिंगबाबत हा दंड करण्यात आल्यामुळे तुमचा डेटा खरचं सुरक्षित आहे का, असा प्रश्नही आता निर्माण होऊ लागला आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp मुळे Meta ला मोठा दणका, तब्बल 213 कोटींचा दंड, पण प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल