TRENDING:

YouTube व्हिडिओ पाहून ट्रेडिंग शिकताय? व्हा सावधान, महिलेला 11 लाखांचा चुना 

Last Updated:

Cyber Fraud: सायबर फ्रॉडची प्रकरणं ही झपाट्याने वाढताय. फसवणूक करणारे नवनवीन पद्धती तुम्हाला फसवण्यासाठी शोधत असतात. यूट्यूबवर ट्रेडिंग शिकणाऱ्या एका महिलेची मोठी फसवणूक झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सायबर फ्रॉडची असंख्य प्रकरणे सध्या समोर येत आहेत. कारण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय. मोबाईल बँकिंगचे प्रमाणही वाढतेय. हे सोयिस्कर आहे. पण सायबर फसवणूक करणारे याचा फायदा घेत आहेत. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर एक फसवणुकीचं प्रकरणं समोर आलंय. येथे 51 वर्षांच्या एका शिक्षिकेने सायबर फ्रॉडच्या जाळ्यात अडकून आपल्या मेहनतीची कमाई गमावलीये. या महिलेला तब्बल 11.75 लाख गमवावे लागलेय.
सायबर फ्रॉड
सायबर फ्रॉड
advertisement

यूट्यूब व्हिडिओवरुन सुरू झालं प्रकरण 

या प्रकरणाची सुरुवात ही यूट्यूब व्हिडिओने झाली. शिक्षिका ऑनलाइ ट्रेडिंगशी संबंधित एक व्हिडिओ पाहत होती. ज्यामध्ये कमी काळात जास्त नफा कमावण्याचा दावा केला जात होता. व्हिडिओमध्ये एक अ‍ॅप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला होता. महिलेने ते अ‍ॅप फोनमध्ये इंस्टॉल केलं आणि गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीला तिला छोटे-छोटे फायदे मिळाले. यामुळे तिचा विश्वास आणखी वाढला.

advertisement

Gold Loan घेताय? 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात! अगदी स्वस्तात मिळेल कर्ज, वाचतील पैसे

ग्रुपमध्ये अ‍ॅड झाली अन् झाला गेम 

काही दिवसांनंतर त्या महिलेला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले. तिथे स्वतःला एक्सपर्ट असल्याचे सांगणारे लोक शेअर बाजाराविषयी सल्ला देत होते. ग्रुपमध्ये सतत नफ्याचे स्क्रीनशॉर्ट आणि सक्सेस स्टोरी शेअर केल्या जात होत्या. यामुळे महिलेला या सर्व गोष्टींवर विश्वास बसला. यावेळी तिला आणखी एक लिंक पाठवण्यात आली. तिने ते अ‍ॅप डाउनलोड केले आणि तिने आपल्या केवायसीची माहितीही त्यात भरली.

advertisement

यानंतर महिलेला एका ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. महिलेने 6 मार्च ते 14 मार्च दरम्यान वेगवेगळ्या ट्रांझेक्शनच्या माध्यमातून एकूण 11.75 लाख रुपये ट्रान्सफर केले. अॅपमध्ये गुंतवणूक वाढताना दिसत होती, महिलेला नफाही दिसत होता. ज्यामुळे ती पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला काहीना काही कारण सांगून गोष्ट टाळण्यात आली.

advertisement

अनेक प्रयत्न करुनही महिलेला नफा मिळाली नाही आणि तिची मूळ रक्कमही परत मिळाली नाही. यानंतर तिला कळलं की, तिची फसवणूक झालीये. यानंतर तिने सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आयटी फॅक्ट संबंधित कलम आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा केलाय. या प्रकरणाचा पुढील तपासही सुरूये.

SBIची अमृत वृष्टी स्पेशल FD स्किम आहे भारी! 2 लाखांच्या एफडीवर मिळतं बंपर व्याज

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

या घटनेवरून स्पष्ट कळतं की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसणारी प्रत्येक माहिती ही खरी नसते. ऑनलाइन गुंतवणूकीच्या नावावर मोठा फ्रॉड होऊ शकतो. यामुळेच सावध राहणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची मेहनतीची कमाई चोरट्यांच्या हातात जाऊ शकते.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
YouTube व्हिडिओ पाहून ट्रेडिंग शिकताय? व्हा सावधान, महिलेला 11 लाखांचा चुना 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल