जियो पोस्टपेड फॅमिली प्लॅन
- जियोचा सर्वात प्रसिद्ध फॅमिली प्लॅन 449 रुपयांपासून सुरू होतो. यात मेन सिमवर 75GB डेटा मिळतो. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज 100एसएमएसचा फायदा आहे. यात तुम्ही 3 अॅडिशनल सिम 150 रुपये प्रत्येकी जोडू शकता.
- 4 लोकांचं पूर्ण कुटुंब फक्त 899 रुपयांत (449 + 150×3) कनेक्टेड राहू शकतं. म्हणजेच प्रति व्यक्ती फक्त 225 रुपये खर्च येतो. डेटा शेयरिंगची सुविधा आहे. कोणताही सदस्य जास्तही डेटा वापरू शकतो.
- JioTrue 5G वर अनलिमिटेड डेटाची वेलकम ऑफरही मिळते. एकच बिल, सोपी पेमेंट आणि पूर्ण कुटुंबासाठी Jio अॅप्स (सिनेमा, टीव्ही, क्लाउड) चा अॅक्सेस दिला जातो.
advertisement
कोणता फॅन जास्त हवा देतो, 3 Blade की 4 Blade? एकदा अवश्य घ्या जाणून
एयरटेल पोस्टपेड फॅमिली प्लॅन
एयरटेलही कुटुंबासाठी मजबूत ऑप्शन देते. 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 कनेक्शन मिळतात. अनलिमिटेड 4G/5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS/ दिवस. यात अॅमेझॉन प्राइम, जियो हॉटस्टार सारख्या ओटीटी सब्सक्रिप्शनचा समावेश आहे.
मोठ्याकुटुंबासाठी 1199 रुपये किंवा 1399 प्लॅन निवडा. ज्यात 4 कनेक्शनपर्यंत (1+3) मिळू शकतात. एकूणच डेटा 190GB ते 240GB पर्यंतशेअर होऊ शकतो. एयरटेलमध्येही डेटा रोलओव्हर, एक सिंगल बिल आणि Xstream Play प्रीमियम सारखी सुविधा उपलब्ध आहेत.
वेगळे रिचार्ज प्लॅन vs फॅमिली प्लान-किती बचत?
4 लोकांनी वेगवेगळे प्रीपेड रिचार्ज केल्यावर महिन्याचा खर्च सहज 1600-2000 रुपये होतो. तर जियो फॅमिली प्लॅनमध्ये पूर्ण खर्च 899 रुपये आणि एयरटेलमध्ये 1199 रुपयांपासून सुरू होतो.
म्हणजेच दरमहा 700-1000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग, जास्त डेटा आणि ओटीटी बेनिफिट्स मिळू शकतात.
Google चा मोठा धमाका! आता कोणीही फ्री बनवू शकतो AI व्हिडिओ, हे फीचर कसं काम करणार?
फॅमिली प्लॅन का निवडावा?
- एक बिल, कमी टेन्शन
- डेटा शेयरिंग - कोणीही जास्त वापर करू शकतो.
- अनलिमिटेड कॉलिंग पूर्ण कुटुंबाला
- चांगले नेटवर्क आणि एक्स्ट्रा सुविधा
- सहज अॅप किंवा स्टोरने अॅक्टिव्हेट करा
तुम्ही घरात 3 ते 4 मोबाईल यूझर्स असाल तर वेगवेगळे रिचार्ज बंद करुन तुम्ही अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. यामुळे पैशांची बचत होईल यासोबच संपूर्ण कुटुंब जोडलेले राहील. आजच जियो किंवा एयरटेल अॅपओपन करा, प्लॅन चेक करा आणि फॅमिली प्लॅन अॅक्टिव्हेट करा. स्मार्ट निवडीने दरमहा हजारो रुपयांची बचत होऊ शकते.
