Google चा मोठा धमाका! आता कोणीही फ्री बनवू शकतो AI व्हिडिओ, हे फीचर कसं काम करणार?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Google Vids मध्ये मोठं अपडेट आलं आहे. यानंतर आता सर्वांनाच फ्रीमध्ये व्हिडिओ तयार करता येतील. ते कसे करायचे आणि किती वेळेचे हे व्हिडिओज असतील याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : सोशल मीडियावर आता विविध विषयांचे एआय व्हिडिओ बनवणं सोपं झालंय. कारण अनेक प्लॅटफॉर्मवर तुम्ही व्हिडिओ तयार करू शकतात. आता गूगलने आपल्या AI व्हिडिओ प्लॅटफॉर्म गूगल Vids मध्ये मोठे अपडेट जारी केलेय. ज्यामुळे आता व्हिडिओ तयार करणे जास्त सोपं आणि क्रिएटिव्ह झालंय. या अपडेटची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, आता सामान्य यूझर्सही फ्रीमध्ये AI व्हिडिओ जनरेट करू शकतील. हे यापूर्वी फक्त पेड सब्सक्रायबर्स करू शकत होते.
आता यूझर्स Veo 3.1 च्या मदतीने टेक्स्ट किंवा इमेज इनपुट पाहून 8 सेकंदांपर्यंत शॉर्ट व्हिडिओ तयार करू शकतात. खरंतर प्री यूझर्ससाठी प्रत्येक महिन्यात 10 व्हिडिओ तयार करण्याची लिमिट ठरवण्यात आली आहे. मात्र तरीही हे फीचर कंटेंट क्रिएटर्स, विद्यार्थी आणि सोशल मीडिया यूझर्ससाठी खुप फायदेशीर ठरेल.
या अपडेटसह गूगलने कस्टम साउंडट्रॅकचं फीचरही जोडलं आहे. Lyria 3 आणि Lyria 3 Pro मॉडलच्या मदतीने यूझर्स आपल्या व्हिडिओसाठी AI-जनरेटेड म्यूझिक तयार करू शकतात. हे म्यूझिक 30 सेकंदांपासून 3 मिनिटांपर्यंत असू शकते. खरंतर हे फीचर सध्या फक्त गूगल AI Pro आणि AI Ultra यूझर्ससाठी उपलब्ध आहे.
advertisement
AI Avatar ही मिळणार
यासोबतच एआय अवतार नावाचं एक नवं फीचरही जोडण्यात आलं आहे. ज्यामुळे यूझर्स आपल्या व्हिडिओमध्ये डिजिटल अँकर तयार करू शकतात. हा अवतार प्रत्येक व्हिडिओमध्ये एकसारखा चेहरा आणि आवाज टिकवून शेवतो. ज्यामुळे व्हिडिओ जास्त प्रोफेशनल आणि आकर्षक वाटतो. यूझर्स याचा लूक, आउटफिट आणि बँकग्राउंडलाही आपल्या गरजेनुसार कस्टमाइज करू शकतात.
advertisement
व्हिडिओ क्रिएशन आणखी सोपं बनवण्यासाठी गूगलने स्क्रीन रेकॉर्डर एक्सटेंशनही सादर केलंय. यामुळे यूझर्स कुठूनही आपली स्क्रीन किंवा स्वतः रेकॉर्ड करू शकतात. सोबतच आता व्हिडिओ थेट यूट्यूबवर पब्लिश करू शकतात. ज्यामुळे डाउनलोड आणि अपलोडचं टेन्शन दूर होतं. हे अपडेट AI व्हिडिओ क्रिएशन पहिल्यापेक्षा जास्त सोपं, वेगवान आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 1:28 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google चा मोठा धमाका! आता कोणीही फ्री बनवू शकतो AI व्हिडिओ, हे फीचर कसं काम करणार?









