advertisement

आज हिंदू वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, उपवास सोडताना करू नका 'ही' चूक; कधी सोडावा?

Last Updated:
आज 5 एप्रिल 2026, रविवार रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला 'विकट संकष्टी' असे संबोधले जाते. बाप्पाचे अनेक भक्त आज कडक उपवास करत आहेत. मात्र, संकष्टीचा उपवास हा इतर उपवासांपेक्षा वेगळा असतो, कारण तो चंद्रदर्शनावर अवलंबून असतो.
1/7
आज 5 एप्रिल 2026, रविवार रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला 'विकट संकष्टी' असे संबोधले जाते. बाप्पाचे अनेक भक्त आज कडक उपवास करत आहेत. मात्र, संकष्टीचा उपवास हा इतर उपवासांपेक्षा वेगळा असतो, कारण तो चंद्रदर्शनावर अवलंबून असतो. अनेकदा भक्त दिवसभर उपवास करतात, पण उपवास सोडताना काही छोट्या चुका करतात, ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही.

2/7
चंद्रदर्शनाशिवाय उपवास सोडू नका: संकष्टी चतुर्थीचा सर्वात मुख्य नियम म्हणजे 'चंद्रदर्शन'. जोपर्यंत आकाशात चंद्र दिसत नाही आणि आपण चंद्राला अर्घ्य देत नाही, तोपर्यंत हा उपवास पूर्ण मानला जात नाही. आज मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात चंद्रोदयाची वेळ रात्री 10:20 ते 10:25 च्या दरम्यान आहे. त्यामुळे त्यापूर्वी घाईने जेवण करणे टाळावे.

3/7
चंद्राला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत: चंद्रोदय झाल्यावर एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात अक्षता, पांढरी फुले आणि थोडे चंदन टाकावे. चंद्राकडे बघून हे पाणी जमिनीवर सोडावे. यावेळी 'गं गणपतये नम:' किंवा चंद्राच्या मंत्राचा जप करावा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच प्रत्यक्ष उपवास सोडण्याची प्रक्रिया सुरू होते.

4/7
गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणे अनिवार्य: स्वतः जेवणापूर्वी गणपती बाप्पाला शुद्ध सात्त्विक अन्नाचा नैवेद्य दाखवावा. संकष्टीला बाप्पाला मोदक किंवा लाडू अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर मोदक शक्य नसतील, तर गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्याशिवाय उपवास सोडणे ही मोठी चूक मानली जाते.

5/7
तामसी पदार्थांचा त्याग: उपवास सोडताना जे अन्न आपण ग्रहण करतो, ते पूर्णपणे सात्त्विक असावे. जेवणात कांदा आणि लसूण यांचा वापर टाळावा. अनेक लोक दिवसभर उपवास करतात आणि रात्री कांदा-लसूण घातलेले पदार्थ खातात, ज्यामुळे व्रताची सात्त्विकता संपते. उपवास सोडताना साधे वरण-भात किंवा पालेभाजीचे सेवन करणे उत्तम.

6/7
पाण्याने उपवास सोडावा: नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वात आधी बाप्पाचे तीर्थ किंवा थोडे पाणी पिऊन उपवास सोडावा. त्यानंतरच अन्न ग्रहण करावे. एकदम जड अन्न खाण्यापेक्षा सुरुवातीला हलका आहार घेतल्याने आरोग्यालाही त्रास होत नाही.

7/7
चुकीच्या दिशेला बसून जेवण टाळा: उपवास सोडताना शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. जेवणापूर्वी गणपतीचे स्मरण आणि 'वदनी कवळ घेता' हा श्लोक म्हटल्याने अन्नाचे रूपांतर ऊर्जेत होते आणि बाप्पाचा आशीर्वाद लाभतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement