advertisement

'तुझे सीक्सर फक्त भारतात...' सचिन तेंडुलकरही चक्रावला, राकेश बेदी असं काही बोलतील वाटलंही नव्हतं, VIDEO

Last Updated:

Rakesh Bedi in Dhurandhar 2: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने राकेश बेदींचं कौतुक केलं आहे. मात्र, यावर राकेश बेदी यांनी दिलेला रिप्लाय ऐकून खुद्द सचिन क्लीन बोल्ड झाला.

News18
News18
मुंबई : सध्याच्या घडीला प्रत्येकजण धुरंधर २ फिल्मच्या आणि या फिल्ममधील कलाकारांच्या प्रेमात पडलेला आहे. जो कोणी येतो, तो हेच म्हणतोय की ही फिल्म भारी आहे. अशातच एखाद्या लोकप्रिय सेलिब्रिटीने फिल्मचं कौतुक केल्यावर फिल्ममधील कलाकारांनाही हुरूप येतो. असंच काहीसं घडलंय फिल्ममध्ये जमील जमाली ही भूमिका साकारणाऱ्या राकेश बेदी यांना. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने राकेश बेदींचं कौतुक केलं आहे. मात्र, यावर राकेश बेदी यांनी दिलेला रिप्लाय ऐकून खुद्द सचिन क्लीन बोल्ड झाला.
नुकतंच स्वतः राकेश बेदी यांनी सचिनसोबत घडलेला हा मजेशीर किस्सा सर्वांसोबत शेअर केला. सध्या सोशल मीडियावर हा किस्सा तुफान व्हायरल झाला आहे. खुद्द सचिन तेंडुलकरने आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' या राकेश बेदींच्या कामाचं कौतुक केलं, पण त्यावर बेदींनी जे उत्तर दिलं, त्याने खुद्द मास्टर ब्लास्टरही थक्क झाला. नेमकं काय घडलं या दोघांच्या भेटीत?
advertisement

सचिन तेंडुलकरला राकेश बेदींची गुगली

राकेश बेदी यांनी सांगितलं, 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी राकेश बेदी यांची भेट घेतली आणि त्यांच्या अभिनयाची भरभरून स्तुती केली. सचिन म्हणाला, "मिस्टर राकेश, तुमचा अभिनय बघून खूप मजा आली. तुम्ही खरोखरच ग्रेट काम केलंय." सचिनसारख्या महान खेळाडूने केलेल्या या कौतुकाने कोणीही भारावून गेलं असतं, पण राकेश बेदींनी आपल्या खास विनोदी शैलीत सचिनवरच गुगली टाकली.
advertisement
सचिनने केलेल्या कौतुकाला उत्तर देताना राकेश बेदी मिश्किलपणे म्हणाले, "हो सर, तुम्हीही खूप ग्रेट काम केलंय. पण फरक एवढाच आहे की, तुमचे सिक्सर भारतात पडले आणि माझे सिक्सर मात्र पाकिस्तानात पडले." हे ऐकताच एकच हशा पिकला. बेदींच्या या उत्तराचा रोख 'धुरंधर'च्या सीमेपलीकडील लोकप्रियतेकडे होता. 'धुरंधर २' मध्ये त्यांनी साकारलेली भूमिका आणि एकंदरीत भारतीय सिनेमाचा पाकिस्तानात असलेला मोठा चाहता वर्ग, याला त्यांनी आपल्या विनोदाची जोड दिली.
advertisement
advertisement

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २'चा डंका

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत आहे. रणबीर कपूरच्या 'रामायण'ची चर्चा सुरू असतानाच, रणबीरचाच 'धुरंधर २' एकापाठोपाठ एक रेकॉर्ड्स मोडत आहे. १८ व्या दिवशी या चित्रपटाने भारतात तब्बल १००० कोटींचा टप्पा पार केला असून जगभरात १५६४ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुझे सीक्सर फक्त भारतात...' सचिन तेंडुलकरही चक्रावला, राकेश बेदी असं काही बोलतील वाटलंही नव्हतं, VIDEO
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement