advertisement

Kitchen Hacks : मटण शिजवताना टाका 'हे' घटक, काही मिनिटांतच होईल सॉफ्ट! चव वाढेल अन् होईल ज्युसी

Last Updated:

काही लोकांकडे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी मटण बनवतात. चपाती, भाकरी किंवा गरम भातासोबत ते खाल्लं जातं. पण मटण शिजवणं जितकं अवघड आहे, तितकंच ते वेळखाऊ आहे.

मऊ मटण कसे बनवायचे
मऊ मटण कसे बनवायचे
मुंबई : आपल्याकडे मटण चिकन खाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. जे लोक मटण चिकन खातात, त्यांना माहित असेल की चिकन लवकर शिजतं. पण मटण शिजण्यासाठी अर्धा पाऊण तास लागतो. म्हणूनच मटण घरी बनवण्याचा आपण बऱ्याचदा कंटाळा करतो. पण यावर एक उत्तम उपाय आहे.आपल्या किचनमध्ये दोन असे घटक आहेत, जे मटण लवकर शिजवण्यासाठी मदत करतात.
काही लोकांकडे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी मटण बनवतात. चपाती, भाकरी किंवा गरम भातासोबत ते खाल्लं जातं. पण मटण शिजवणं जितकं अवघड आहे, तितकंच ते वेळखाऊ आहे. मटण शिजवण्याची प्रत्येक गराची पध्दतही वेगवेगळी असते. कोणी कुकरमध्ये मटण शिजवतात, तर कोणी पातेल्यात. पण ते पातेल्यात शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो.
व्यवस्थित न शिजलेलं मटण खायला आणि पचायला अवघड जाऊ शकतं. कारण ते खूप चावावं लागतं. शिवाय प्रेशर कुकरमध्ये जास्तवेळ ठेवल्यास मटण गाळ होऊ शकतं, जे आणखीच बेचव लागतं. म्हणूनच किचनमधल्या या दोन वस्तू आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
advertisement
मटण लवकर शिजवण्याची योग्य पद्धत कोणती?
मटण लवकर शिजवण्यासाठी तुम्हाला दोन घटक वापरावे लागतील. मेथीचे दाणे आणि दही. जेव्हा तुम्ही कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये मटण मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्याल आणि पाणी घालणार असाल, तेव्हा त्यात आधीच थोडे मेथीचे दाणे घाला. मेथीच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे मटण लवकर शिजण्यास मदत होते. यामुळे वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होते. पण मेथी जास्त प्रमाणात घालू नका. कारण त्यामुळे चव कडू लागू शकते.
advertisement
मेथी घालायची नसेल, तर तुम्ही दही वापरू शकता. मटण दह्यामध्ये आलं-लसूण पेस्ट आणि मसाल्यांसोबत मिसळून 20-25 मिनिटे मॅरीनेट करा. यामुळे मटण मऊ होईल. शिजल्यावर ते रबरासारखे लागणार नाही आणि मांस हाडांपासून सहज वेगळे होईल.
काही वैज्ञानिक संशोधनानुसार, काही नैसर्गिक घटक मांस मऊ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 'जर्नल ऑफ फूड सायन्स'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, दह्यामधील लॅक्टिक ॲसिड मांसाचे तंतू तोडते. यामुळे मटण मऊ होऊन लवकर शिजतं. मेथीमधील घटक उष्णता वाढल्यावर मटण लवकर शिजण्यास मदत करतात. याचा वापर करून तुम्ही कमी वेळात स्वादिष्ट मटण तयार करू शकता.
advertisement
मटणामध्ये मेथी आणि दही घातल्याने मटण अगदी कमी वेळात लोण्यासारखं मऊ शिजतं. यामुळे गॅसची बचत होते, कमी श्रम लागतात, मूळ चव आणि पोषक तत्वे टिकून राहतात. आता जेव्हाही तुम्ही मटण बनवाल, तेव्हा त्यात मेथीचे दाणे आणि दही नक्की घाला. तुम्हाला कमीत कमी वेळेत अप्रतिम चव मिळेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : मटण शिजवताना टाका 'हे' घटक, काही मिनिटांतच होईल सॉफ्ट! चव वाढेल अन् होईल ज्युसी
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement