advertisement

IPL 2026 : 13 कोटींच्या विकेटसाठी पंत पिचवर लोळला, काव्याने डोक्याला हात लावला, Video

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये लखनऊविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 156 रन केल्या. या सामन्यात लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने उत्कृष्ट कॅच पकडला.

13 कोटींच्या विकेटसाठी पंत पिचवर लोळला, काव्याने डोक्याला हात लावला
13 कोटींच्या विकेटसाठी पंत पिचवर लोळला, काव्याने डोक्याला हात लावला
हैदराबाद : आयपीएल 2026 मध्ये लखनऊविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 156 रन केल्या. या सामन्यात लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पहिल्याच ओव्हरपासून लखनऊच्या बॉलरनी हैदराबादला धक्के दिले. पॉवर प्लेमध्येच हैदराबादने 3 विकेट गमावून फक्त 22 रन केल्या, तर पहिल्या 10 ओव्हरमध्ये त्यांचा स्कोअर 35/4 एवढा होता.
पहिल्या 4 विकेट स्वस्तात गमावल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेनने लखनऊच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. हेनरिक क्लासेनने 41 बॉल 62 तर नितीश कुमार रेड्डीने 33 बॉल 56 रनची खेळी केली, त्यामुळे हैदराबादला 156 रनपर्यंत मजल मारता आली. रेड्डी आणि क्लासेनच्या आक्रमक बॅटिंगमुळे हैदराबादने शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 122 रन केल्या.

मोहम्मद शमीचा भेदक स्पेल

advertisement
लखनऊकडून मोहम्मद शमी हा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. शमीने 4 ओव्हरमध्ये फक्त 9 रन देऊन 2 विकेट घेतल्या. तर प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनाही 2-2 विकेट मिळाल्या. तर दिग्वेश राठी आणि मणिमरन सिद्धार्थ यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये सनरायजर्स हैदराबादने इंग्लंडचा विस्फोटक बॅटर लियाम लिव्हिंगस्टोनला 13 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन हैदराबादच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळला नव्हता, पण आता लखनऊविरुद्धच्या सामन्यात लिव्हिंगस्टोनला संधी मिळाली, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही.
20 बॉलमध्ये 14 रन करून लिव्हिंगस्टोन दिग्वेश राठीच्या बॉलिंगवर आऊट झाला. लखनऊचा कर्णधार आणि विकेट कीपर ऋषभ पंत याने लियाम लिव्हिंगस्टोनचा उत्कृष्ट कॅच पकडला. राठीच्या बॉलवर स्कूप मारण्यासाठी लिव्हिंगस्टोन ऑफ स्टम्पच्या बाहेर गेला. लिव्हिंगस्टोन ऑफ स्टम्पबाहेर जाऊन लेग साईडला बॉल मारत असल्याचं लक्षात येताच पंत लेग साईडच्या दिशेला गेला, पण बॉल लेग साईडला न जाता ऑफ साईडला जातोय हे लक्षात येताच पंतने चपळता दाखवली आणि खेळपट्टीवरच उडी मारून त्याने कॅच घेतला. ऋषभ पंतची फिल्डिंग पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेली सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारननेही डोक्याला हात लावला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 13 कोटींच्या विकेटसाठी पंत पिचवर लोळला, काव्याने डोक्याला हात लावला, Video
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement