पत्नीला हाकललं अन् तृतीयपंथीयाला घरी आणलं, पतीचं धक्कादायक कांड, छ. संभाजीनगरची घटना
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक बाब म्हणजे पतीचे एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप पत्नीने केला आहे.
छत्रपती संभाजीनगर: सध्याच्या काळात कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढत आहेत. पती-पत्नीच्या नात्यांत देखील अगदी किरकोळ कारणावरून दुरावा आल्याच्या घटना देखील पुढे येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 वर्षीय विवाहितेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. 37 वर्षीय पतीचे एका तृतीयपंथीयासोबत संबंध असून त्यासाठी आपला छळ सुरू असल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणात पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार तरुणी ही बायजीपुरा परिसरातील असून, 6 मार्च 2022 रोजी तिचा विवाह भोकरदन येथील युवकासोबत पार पडला होता. लग्नावेळी तिच्या आई-वडिलांनी पतीला एक तोळा सोन्याची अंगठी, कपड्यांसाठी सुमारे तीस हजार रुपये तसेच संसारोपयोगी साहित्य दिले होते. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा गर्भपात झाला. त्यानंतर पती, सासू, सासरे, जेठाणी, देवर आणि नणंद या सर्वांकडून तिला वारंवार त्रास दिला जाऊ लागला.
advertisement
किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मानसिक छळ तसेच पती आणि जावेने तिला मारहाण केल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. पुढील काळात तिला मुलगा झाला असला तरीही छळ थांबला नाही. 26 जून 2025 रोजी पतीने व्यवसायासाठी तिच्या माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिला मारहाण करण्यात आली आणि छळ वाढतच गेला, असा आरोप तिने केला आहे.
advertisement
पतीचे तृतीयपंथीयासोबत संबंध
धक्कादायक बाब म्हणजे पतीचे एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. तो संबंधित व्यक्तीला घरी आणत असे आणि पत्नीला खोलीबाहेर हाकलून देत होता. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर तिची आई भोकरदन येथे जाऊन तिला घेऊन छत्रपती संभाजीनगरला आली. तेव्हापासून ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
advertisement
दरम्यान, पतीने तिला किंवा त्यांच्या मुलाला परत नेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याचेही तिने नमूद केले आहे. यानंतर गावातील लोकांकडून तिला पतीने दुसरे लग्न केल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार विठ्ठल राठोड करत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 5:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पत्नीला हाकललं अन् तृतीयपंथीयाला घरी आणलं, पतीचं धक्कादायक कांड, छ. संभाजीनगरची घटना








