advertisement

IPL 2026 : पंतने विनिंग शॉट मारला, गोएंका ढसाढसा रडले... 55 हजार लोक पाहत राहिले, Video

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 5 विकेटने विजय मिळवला आहे. या विजयानंतर लखनऊचे मालक संजीव गोएंका यांना अश्रू अनावर झाले आहेत.

पंतने विनिंग शॉट मारला, गोएंका ढसाढसा रडले... 55 हजार लोक पाहत राहिले, Video
पंतने विनिंग शॉट मारला, गोएंका ढसाढसा रडले... 55 हजार लोक पाहत राहिले, Video
हैदराबाद : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 5 विकेटने विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेलं 157 रनचं आव्हान लखनऊने 19.5 ओव्हरमध्ये पार केलं. लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने 50 बॉलमध्ये नाबाद 68 रनची खेळी केली, तर एडन मार्करमने 27 बॉलमध्ये 45 रन केले. हैदराबादच्या संथ खेळपट्टीवर लखनऊच्या विकेट एका मागोमाग एक जात होत्या पण ऋषभ पंतने किल्ला लढवून टीमला विजय मिळवून दिला.
आयपीएल 2026 च्या यंदाच्या मोसमातला लखनऊचा हा पहिलाच विजय आहे. या विजयानंतर स्टेडियममध्ये बसलेले लखनऊचे मालक संजीव गोएंका यांना अश्रू अनावर झाले. ऋषभ पंत लखनऊला विजयाच्या जवळ पोहोचवत होता, तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले संजीव गोएंका ढसाढसा रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या स्क्रीनवरही हा क्षण दाखवला गेला तेव्हा स्टेडियममध्ये असलेले 55 हजार प्रेक्षक हे स्क्रीनवर पाहत होते.
advertisement
advertisement
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात लखनऊचा दिल्लीविरुद्ध 6 विकेटने पराभव झाला. या सामन्यानंतर संजीव गोएंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातल्या मैदानातल्या चर्चेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दोघांमध्ये सामना संपल्यानंतर मैदानात वाद झाल्याचा दावाही केला गेला, पण लखनऊ सुपर जाएंट्सने हा दावा फेटाळून लावत मैदानात नेमकं काय झालं? याचा अनफिल्टर व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.
advertisement
याआधी लखनऊ सुपर जाएंट्सने मालक संजीव गोएंका यांचं तेव्हाचा टीमचा कर्णधार केएल राहुल याच्यासोबतही मैदानात वाद झाल्याचं बोललं गेलं. यानंतर केएल राहुलने लखनऊची साथ सोडली आणि तो दिल्लीच्या टीममध्ये गेला.

ललित मोदींचा गोएंकांवर निशाणा

ऋषभ पंत आणि संजीव गोएंका यांचा मैदानातला व्हिडिओ समोर आल्यानंतर आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी संजीव गोएंका यांच्यावर निशाणा साधला. तसंच मी आयपीएल कमिशनर असतो तर संजीव गोएंका यांच्यावर बंदी घातली असती, असं ललित मोदी म्हणाले.
advertisement
'लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका लूजर आणि जोकर आहे. मला त्यांच्या या वर्तणुकीमुळे लाज वाटत आहे. मी आयपीएल फॅन्स आणि खेळाडूंना तयार केलं होतं. मी आज आयपीएल कमिशनर असतो तर मी तातडीने गोएंकांवर बंदी घातली असती आणि त्यांच्याकडून टीमचा मालकी हक्क काढून घेतला असता. ते अहंकारी जोकर आहेत. एखादी फ्रॅन्चायजी आयपीएल करार करते तेव्हा अशा वर्तनासाठी नियम आहे. बीसीसीआयने हा नियम लागू करावा. चाहते आणि खेळाडू हे वर्तन कायम लक्षात ठेवतील', अशी टीका ललित मोदी यांनी केली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पंतने विनिंग शॉट मारला, गोएंका ढसाढसा रडले... 55 हजार लोक पाहत राहिले, Video
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement