advertisement

Rohit Sharma : 'तू काय गल्ली क्रिकेट खेळतोयस...', DRS वरुन रोहित शर्माने पुन्हा कुलदीप यादवची शाळा घेतली, VIDEO

Last Updated:

मुंबई इंडियन्सच्या आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात रोहित शर्मा विरूद्ध डिआरएस घेण्याचा प्रसंग कुलदीपसमोर आला होता. पण नेहमीप्रमाणे कुलदीप चुकला आणि रोहित त्यावर खळखळून हसला होता.

Rohit sharma reaction on Kuldeep Yadav drs
Rohit sharma reaction on Kuldeep Yadav drs
Rohit sharma Kuldeep Yadav : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा नेहमीच चायनामॅन कुलदीप यादवला मैदानात झापताना दिसला आहे. या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल व्हायचे. पण आयपीएलमध्ये हे शक्य होत नाही आहे. कारण दोन्हीही खेळाडू वेगवेगळ्या संघात आहेत.पण असे जरी असले तरी कालच्या मुंबई इंडियन्सच्या आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात रोहित शर्मा विरूद्ध डिआरएस घेण्याचा प्रसंग कुलदीपसमोर आला होता. पण नेहमीप्रमाणे कुलदीप चुकला आणि रोहित त्यावर खळखळून हसला होता. त्यानंतर आता रोहितच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ समोर आली आहे.या व्हिडिओमध्ये त्याने कुलदीप यादवची शाळा घेतली आहे.
खरं तर कुलदीप यादव हा असा गोलंदाज आहे, ज्याला प्रत्येक बॉलवर डिआरएस हवा असतो,असे रोहित शर्मा एकदा म्हणाला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतासाठी खेळताना कुलदीप यादवने अनेकदा अशाप्रकारचा डिआरएस घेतला आहे. पण या डीआरएसमध्ये खुप कमी वेळ त्याला विकेट मिळाली आहे.त्यामुळे रोहितने कुलदीपच्या या सवयीवर त्याला अनेकदा झापलं आहे. अशाचप्रकारे एका मुलाखतीत बोलताना रोहित शर्माने कुलदीपला झापलं आहे.
advertisement
तू बॉल टाक गपचूप आणि मागे जा, तू प्रत्येक बॉलवर अपील कसा करू शकतोस. ही कॉमनसेन्सची गोष्ट आहे.सारखं सारखं बोलून मी पण बोलून थकलोय,अशा शब्दात रोहित शर्माने कुलदीप यादवला झापलं आहे. तसेच भावा, तुला डोकं लावाव लागेल पहिल्यांदा बॉल कुठे पडला आहे, आणि कुठे लागला आहे. पण पॅडवर लागलाय म्हणजे आऊट आहे, पण तू गल्ली क्रिकेट थोडी खेळतोय,पायावर लागला म्हणजे आऊट आहे एलबीडब्ल्यू आहे, असं नसतं, असे देखील रोहित म्हणाला आहे.
advertisement
advertisement
त्यामुळे जेव्हा कुलदीप यादवच्या बॉलवर जेव्हा डिआरएस घ्यायचा असतो तेव्हा मी त्याच्याकडे बघत नाही. या उलट मी किपरला विचारतो, कुठे बॉल लागला आहे. काय वाटतंय तुला? असे रोहित सांगतो.
दरम्यान कालच्या सामन्यात देखील कुलदीप यादवसोबत डिआरएसची घटना घडली होती. कुलदीप यादवच्या 9 व्या ओव्हरला ही घटना घडली आहे.या घटनेत कुलदीपच्या पाचव्या बॉलवर शॉर्ट मारताना रोहित शर्मा मिस झाला होता. पण या दरम्यान काही तरी आवाज आल्याने विकेट मागून केएल राहुलने अपील केले त्याच्या जोडीला कुलदीप यादव देखील आला. दोघांच्या अपीलनंतर रोहित पव्हेलियनच्या दिशेने निघाला होता,पण दोन पाऊल पुढे टाकताच अंपायरने नॉट करार दिले.
advertisement
त्यानंतर कुलदीपने अक्षरला डीआरएस घ्यायला सांगितलं. पण त्याचा नकार होता. तरी देखील कुलदीपने त्याला डिआरएस घ्यायला भाग पाडलं. शेवटी डीआरएसमध्ये रोहित शर्माच्या बॅटीला कड लागलीच नव्हती.त्यामुळे त्याला नॉटआऊट करार देण्यात आले. त्यामुळे अंपायरचा निर्णय येताच रोहित शर्मा मैदानात पोट धरून हसला होता.
दरम्यान मुंबईच्या डावानंतर डीआरएसवरून कुलदीप यादव आणि केएल राहुलसोबतच्या एका मजेशीर क्षणाबद्दल रोहित शर्माला विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, "मला माहित आहे की कुलदीपला डीआरएस घ्यायला आवडतो आणि मी माझे नशीब आजमावले.मी फक्त तिथे चालत जाण्याचा प्रयत्न करत होतो, मला माहित आहे की जेव्हा धावसंख्या ५०-५० असते तेव्हा कुलदीप रिव्ह्यू घेतो पण मी जास्त वेळ फलंदाजी करू शकलो नाही, नंतर आऊट झालो,असे रोहितने सांगितले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'तू काय गल्ली क्रिकेट खेळतोयस...', DRS वरुन रोहित शर्माने पुन्हा कुलदीप यादवची शाळा घेतली, VIDEO
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement