advertisement

Ulhasnagar : मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेली अन् तिथेच घात झाला; सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला

Last Updated:

Shocking Crime News : उल्हासनगरमध्ये मंदिरात पूजा करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

मंदिरात पूजा करत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून आरोपी फरार
मंदिरात पूजा करत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून आरोपी फरार
मुंबई : उल्हासनगरमध्ये सकाळी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावून नेले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार दोन एप्रिल रोजी सकाळी साडे दहाच्या वेळेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. संबंधित महिला ही शिक्षिका असून नेहमीप्रमाणे महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी आली होती. पुजा करत असताना त्या मंदिरातील पिंडीवर पाणी अर्पण करताना अचानक दोन तरुण दुचारीवरुन तेथे येतात.
या दोघांनीही स्वत:च्या चेहरा हा रुमालाने बांधला होता,त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्या तरुणांनी कोणताही विचार न करता महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचूने घेतेल आणि तिथेून लगेच पळ काढला.
advertisement
महिलेच्या या मंगळसूत्राची किंमत साधारण ही 42 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पण अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरल्या असून परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
advertisement
पोलीस उपनिरीक्षक सचिन गोरे यांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल. या घटनेमुळे मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ulhasnagar : मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेली अन् तिथेच घात झाला; सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement