Stress And Digestion : सतत चिंता आणि तणावात असता? तुमच्या पचनावर होतोय परिणाम! तज्ज्ञांनी सांगितले उपाय
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Stress And Digestive Health : पचनसंस्थेचं आरोग्य केवळ आपण खात असलेल्या अन्नावरच अवलंबून असे असे नाही, त्यावर मेंदूतील विचारांचा देखील प्रचंड प्रभाव असतो.
निरोगी पचनसंस्था असेल तर शरीर निरोगी राहते. त्यामुळं पचनसंस्था निरोगी ठेवणं अतिशय गरजेचं असतं. पचनसंस्थेचं आरोग्य केवळ आपण खात असलेल्या अन्नावरच अवलंबून असे असे नाही, त्यावर मेंदूतील विचारांचा देखील प्रचंड प्रभाव असतो. तुम्हाला सतत तणाव, चिंता आणि अतिताण जाणवत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आतड्यांवरही होऊ शकतो.
advertisement
advertisement
आरोग्य तज्ञ मेंदू आणि आतड्यांमधील या संबंधाला 'गट-ब्रेन ॲक्सिस' असं म्हणतात. द हेल्थ साईट डॉट कॉममध्ये होलिस्टिक लाईफ कोच रिचा अग्रवाल यांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितले की, "आतडे आणि मेंदू एकमेकांना सतत संकेत पाठवत आणि स्वीकारत असतात. संवादाची ही पद्धत व्हेगस नर्व्ह, हार्मोन सिग्नलिंग मार्ग आणि आपल्या आतड्यातील मायक्रोबायोमद्वारे होते. या प्रणालींमध्ये व्यत्यय आल्यास पचनाचे विकार, चिंता आणि नैराश्य अशा मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात."
advertisement
रिचा अग्रवाल यांनी हे देखील सांगितले की, आतड्यातील सूक्ष्मजीव या संवादात महत्त्वाची भूमिका बजावतात. आतड्यातील सूक्ष्मजीव हे सेरोटोनिन आणि गाबा यांसारख्या अनेक न्यूरोअॅक्टिव्ह पदार्थांचे उत्पादक असतात आणि ते मनःस्थिती, आशा आणि भावनिक आरोग्याचे नियमन करण्याचे काम करतात. आतड्यातील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडल्यास त्याचा भावनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळेच दीर्घकालीन तणावाचा अनेकदा पचनावर परिणाम होतो.
advertisement
'नेचर मेंटल हेल्थ'मध्ये 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असेही दिसून आले आहे की, आपला मेंदू आणि पोट यांच्यातील असामान्य संवादाचा वाढलेली चिंता, थकवा आणि भावनिक तणावाशी संबंध असतो. आपलं शरीर हे भावनिक तणाव आणि अन्न पचनावर परिणाम करणारा तणाव यांच्यात फरक करू शकत नाही. त्यामुळं चिंता किंवा तणाव वाढला तर पचनसंस्थेवर त्वरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळेच अनेकदा तणाव वाढल्यानंतर आम्लपित्त, पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









