Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास आता एकदम सुसाट! मार्ग 10 पदरी होणार, मात्र टोलबाबत मोठी अपडेट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
१० पदरीकरणामुळे मुंबई-पुणे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसंच वारंवार होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासह मोठी मदत होईल.
मुंबई: मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे. एक्सप्रेसवेवरील वाहनांची वाढती संख्या आणि सतत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गाचे १० पदरीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली आहे.
प्रकल्प पूर्ण होण्यास लागणार ३ वर्षे
हा प्रकल्प साधारणपणे २०२९-३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १० पदरीकरणामुळे मुंबई-पुणे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसंच वारंवार होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासह मोठी मदत होईल. विशेष म्हणजे, रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
टोलची मुदत १५ वर्षांनी वाढणार?
या अवाढव्य प्रकल्पासाठी लागणारा निधी वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सध्याच्या टोल वसुलीच्या मुदतीत १५ वर्षांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे सध्या २०४५ पर्यंत असलेली टोलची मुदत आता थेट २०६० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याचा अतिरिक्त आर्थिक भार प्रवाशांच्या खिशावर पडणार असला, तरी प्रवासाचा वेग मात्र वाढणार आहे.
advertisement
'मिसिंग लिंक' मे महिन्यात सुरू होणार
एक्सप्रेसवेचा १३ किमीचा अत्यंत महत्त्वाचा असलेला 'मिसिंग लिंक' प्रकल्प मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या लिंकमुळे घाटातील अंतर कमी होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोणावळा आणि खंडाळा घाटातील वळणदार रस्त्याला हा पर्याय ठरणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास आता एकदम सुसाट! मार्ग 10 पदरी होणार, मात्र टोलबाबत मोठी अपडेट









